शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील यांचा पुढील फेरीत प्रवेश

By सुदाम देशमुख | Updated: March 27, 2025 23:32 IST

संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत दुसऱ्या दिवशी १२५ वजनी गटात रंगल्या कुस्त्या

कर्जत : ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत दुसऱ्या दिवशीही ६१ किलो आणि ८६ ते १२५ किलो वजनी गटात माती आणि गादी विभागात रोमहर्षक कुस्ती साखळी सामने पार पडले. याच कुस्तीतून महाराष्ट्र केसरी किताबासाठी विजेता ठरणार आहे. नांदेडचा शिवराज राक्षे व पृथ्वीराज पाटील यांनी पुढील फेरीत प्रवेश मिळविला.गुरुवारी पहिल्या सत्रात गादी विभागातून झालेल्या लढतीत संग्राम पाटील (कोल्हापूर), ओंकार हुलावळे (वाशीम), सुदर्शन मुळे (लातूर), शिवराज राक्षे (नांदेड), अनिल राठोड (छत्रपती संभाजीनगर), अण्णा येमकर (सांगली), रमेश बहिरवळ (बीड), पृथ्वीराज पाटील (मुंबई), मनीष इंगळे (बुलढाणा), देवीदास खंदारे (परभणी), विकास गटकळ (धाराशिव) आणि शुभम माने (सोलापूर) यांनी दिमाखात पुढील फेरीत प्रवेश केला.

जय कदम (सातारा), तुषार सोनवणे (अहिल्यानगर), अतुल धावरे (कोल्हापूर) आणि प्रतीक भक्त (जालना) यांना समोरील मल्लांकडून बाय देण्यात आला. बहुचर्चित नांदेडच्या शिवराज राक्षेने अमरावतीच्या पवन घुणारे याच्यावर चढाई करीत ५ गुणांनी विजय मिळवला. मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलने रत्नागिरीच्या संस्कार लटकेवर १० गुणांनी विजय मिळवत आपला दावा पुढील फेरीच्या लढतीवर ठोकला.अनेक नामवंत मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या केल्या. काहीकाळ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत श्वास रोखणाऱ्या कुस्त्या केल्या. मात्र ज्याचा खेळ सर्वोत्तम झाला त्यास पुढील फेरीत प्रवेश मिळाला. १२५ किलो वजनी गटातून महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत होणार असल्याने आजच्या कुस्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. संध्याकाळी माती विभागात पार पडलेल्या कुस्ती लढतीत या मल्लांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलीमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. एकलपीठ न्यायालयाचा निकाल आणि अधिकार क्षेत्रासंबंधीचा आदेश तथा निरीक्षणे रद्द केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठास या प्रकरणाची सुनावणी गुणवत्तेवर करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या परवानगीने दि.७ एप्रिलला हे प्रकरण यादीत घेऊन त्यावर सुनावणी घेण्याचा आदेश दिला, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वजनी गट निहाय विजेते५७ किलो गट गादी विभाग : सचिन मुरकुटे सुवर्ण (कर्जत, अहिल्यानगर), सचिन चौगुले रौप्य (मुंबई शहर), चेतन यमगर (जळगाव) आणि वैभव चंद्रकांत (सोलापूर) कांस्य पदक. ६५ किलो गट गादी विभाग : विशाल सूळ सुवर्ण (सातारा), हर्षवर्धन बळवकर राैप्य (मुंबई), प्रितेश भगत (कल्याण) आणि आकाश नगरे (बीड) कांस्य पदक. ७४ किलो गादी विभाग : आकाश दुबे सुवर्ण (पुणे शहर), केतन घारे रौप्य (पुणे जिल्हा), भूषण पाटील कांस्य पदक (नाशिक शहर). ५७ किलो माती विभाग : अजित कुद्रेमानकर सुवर्ण (कोल्हापूर), यश बुछगुडे रौप्य (पुणे), विशाल सुरवसे कांस्य पदक (सोलापूर). ६५ किलो माती विभाग : सूरज कोकाटे सुवर्ण (पुणे), तेजस पाटील रौप्य (सांगली), अनिकेत शिंदे (सोलापूर) कांस्य पदक. ७४ किलो माती विभाग : सागर वाघमोडे सुवर्ण (पुणे), श्रीकांत दंडे रौप्य (पुणे), प्रकाश कार्ले (अहिल्यानगर) कांस्य पदक.

टॅग्स :Wrestlingकुस्ती