कोपरगाव : रोजच्या होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात कोपरगाव शहरामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर शनिवारी (दि.१२) आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला. यावेळी सरकारविरोधात व शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसीलदारांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख मुकुंद सीनगर, शहर प्रमुख कलविंदर दडियाल, माजी शहर प्रमुख भरत मोरे, अस्लम शेख, इरफान शेख, विक्रांत झावरे, विशाल झावरे, गगन हाडा, नगरसेविक सपना मोरे, वर्षा शिंगाडे, राखी विसपुते, शीतल चव्हाण, संजय गुरसळ, कुकुशेठ सहानी, भूषण पाटणकर, राहुल देशपांडे, सतीश शिंगाणे, अक्षय नन्नवरे, राहुल होन आदींसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.
...........
फोटो १२- शिवसेना आंदोलन, कोपरगाव