शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदी मोडणाऱ्या मंत्री, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:29 IST

राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेत असल्याने या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

शिर्डी : राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेत असल्याने या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शनिवारी संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील डाव्या कालव्याची आणि त्यावरील आढळा धरणावर बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचा आरोप खासदार लोखंडे यांनी केला. दौऱ्याच्या वेळी मोठ्या संख्येने अधिकारी व कार्यकर्ते जमले होते. राज्यात जमावबंदी असूनही आजचा कार्यक्रम घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांनीच आदेशाचा भंग केला आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची चौकशी करून त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरच्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.लोखंडे म्हणाले, निर्मळ पिंप्री येथे कालव्याचे बंद पडलेले काम चालू करण्यासाठी मी गेलो असताना परिसरातील शेतकरी जमा झाले, तरी आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. खासदारांना एक न्याय आणि मंत्री, अधिकाऱ्यांना एक न्याय का? मग, इथे कोरोनाचे कोणतेही नियम लागू नव्हते का, असा सवाल त्यांंनी केला आहे.

टॅग्स :Sadashiv Lokhandeसदाशिव लोखंडेAhmednagarअहमदनगर