शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत आयारामांनाच मोठेपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:43 IST

शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून आयाराम व धनदांडग्यांना मोठेपण दिल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आहे.

शेखर पानसरेसंगमनेर : शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून आयाराम व धनदांडग्यांना मोठेपण दिल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आहे. नगरपालिकेच्या प्रभाग दहाच्या पोटनिवडणुकीत सेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.संगमनेरच्या शिवसेनेत निष्ठावानांचा एक गट, धनदांडग्यांचा दुसरा गट, तर आयारामांचा तिसरा गट असे उघड-उघड चित्र दिसत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर काम करणारा तळागाळातील शिवसैनिक आजही आहे तेथेच आहे. १९९५ पासून शिवसेनेकडे असणारा हा मतदारसंघ कायमच आयाराम व धनदांडग्यांसाठी संधी ठरला आहे. अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. दोन विधानसभा ते शिवसेनेकडून लढले आणि पुन्हा ते काँग्रेसवासी झाले. सध्या ते विखेंसोबत आहेत. बाबासाहेब कुटे हे नाव कोणाला माहित नव्हते. परंतु २००९ ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. तालुकाध्यक्ष पदावर राहून शिवसेनेवर त्यांनी ताबा मिळवला व नंतर गायब झाले. उद्योजक असल्याने पुन्हा ते व्यवसायात स्थिरावले. राजकारणापासून चार हात लांब राहिले. अशातच अनेक वर्ष मधुकरराव पिचड यांचे निष्ठावान म्हणून काम केलेले जनार्दन आहेर हे राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि थेट विधानसभेची निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला.अप्पासाहेब केसेकर, कैलास वाकचौरे, अमर कतारी यांच्यासारखे ज्येष्ठ व निष्ठावान शिवसैनिक मात्र, फरफटत गेले. त्यांना कधी तिकीट नाकारले गेले तर कधी त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. सोशल माध्यमातून आरोप प्रत्यारोप करणारे अनेकजण सध्या स्वत:ला शिवसेनेचे नेते समजतात. मध्यंतरी शरद थोरातही शिवसेनेत सामिल झाले. तर अनेक वर्षे काँग्रेसमध्ये जाऊन सत्तापदे भोगून जयंत पवार शिवसेनेत परतले. शिवसेनेतील सध्याच्या निर्णयप्रक्रियेतही तथाकथित आयाराम महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसतात.शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. मात्र, या निष्ठेची कदर होत नसल्याने एक प्रकारची मरगळ संघटनेत जाणवते. आयारामांना मोठेपण ही सेनेची प्रतिमा कायम आहे.आयरामांसाठी प्रामाणिक शिवसैनिकांनी कायम पायघड्या घातल्या हा देखील इतिहास आहे. राधाकृष्ण विखेंना १९९६ मध्ये शिवसेनेने राज्यात मंत्रीपद दिले. दिवंगत खासदार बाळासाहेब विखे हे देखील तेव्हा केंद्रात मंत्री होते. त्यांनी १९९९ मध्ये शिवसेना सोडली व काँग्रेसमध्ये प्रवेश केला.तेव्हापासून शिवसैनिकांनी त्यांचा विरोध केला. अगदी काल-परवापर्यंत विखेंना विरोध करणारे आज त्यांच्या बाजूने उभे आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना