शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतील लग्नसोहळ्यात साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 19:27 IST

शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्नसोहळ्यात सोमवारी रात्री चोरट्यांनी वराच्या चुलतीची पर्स पळवून रोख रक्कम व सोने असा जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देया पर्समध्ये पंचवीस हजार रुपये रोख व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने होते. यात सोन्याचे तीन नेकलेस, कानातील सहा कर्णफुले, मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, नाकातील पाच नथ, एक ब्रासलेट, दोन चेन, घड्याळ, चांदीचा शिक्का व आधार कार्ड होते. या सर्व ऐवजाची किंमत साडे

शिर्डी : येथील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्नसोहळ्यात सोमवारी रात्री चोरट्यांनी वराच्या चुलतीची पर्स पळवून रोख रक्कम व सोने असा जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला.याबाबत वर्षा जैन (रा. इंदोर) यांनी शिर्डी पोलिसात सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली. त्यानुसार या पर्समध्ये पंचवीस हजार रुपये रोख व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने होते. यात सोन्याचे तीन नेकलेस, कानातील सहा कर्णफुले, मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, नाकातील पाच नथ, एक ब्रासलेट, दोन चेन, घड्याळ, चांदीचा शिक्का व आधार कार्ड होते. या सर्व ऐवजाची किंमत साडेसहा लाख रुपये आहे.इंदोर येथील जैन परिवार व कोपरगाव येथील अजमेरा परिवार यांचा विवाह सोहळा शिर्डीतील पुष्पक रिसॉर्ट येथे मंगळवारी आयोजित केला होता. यासाठी दोन्ही परिवार आपल्या नातलगांसह सोमवारी शिर्डीत दाखल झाले होते. लग्नानिमित्त हॉटेलमागे उभारलेल्या शामियान्यात रात्री संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नवरेदवाची इंदोर येथील चुलती वर्षा संजय जैन सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपले वापरण्याचे व बहिणीचे दागिने चॉकलेटी पर्समध्ये बरोबर घेतले होते़ कार्यक्रमस्थळी रात्री आठसाडे आठच्या सुमारास त्या नातेवाइकांसह गप्पा मारीत असताना त्यांनी जवळच्या खुर्चीवर पर्स ठेवली होती़ त्यावेळी चोरट्यांनी ही पर्स पळविली.अनेक जण साईनगरीतील विविध हॉटेल किंवा लॉन्सला विवाहसोहळ्याचे आयोजन करीत असतात. मात्र गेल्या एक दोन वर्षांत काही विवाहसोहळ्यांतून महिलांच्या सोने ठेवलेल्या पर्स चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटे लहान मुलांच्या मदतीने या चो-या करीत असल्याचेही वारंवार समोर आले आहे. मात्र विवाहस्थळी नातेवाइकांसारख्या वावरणा-या व्यक्तींना किंवा लहान मुलांना हटकणे सुरक्षारक्षकांना अवघड असते. चोरी झाल्यानंतर तपासासाठी केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागते. सोमवारच्या घटनेतही लाल रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणावर संशय आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप कहाळे सीसीटीव्ही फुटेज व अन्य मार्गाने आरोपीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी