नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, बाळासाहेब ओस्तवाल, भाऊ भोसले, संपत जाधव, राजू गोंदकर, किरण बर्डे, पंडित गुडे, लखन बेलदार, गणेश सोनवणे, नरेश सुराणा, सचिन तनपुरे यांनी निवेदन दिले.
कोरोना महामारीवर स्व-सुरक्षितता आणि लसीकरण हे दोनच उपाय सध्या उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जनेतेचे विनामूल्य लसीकरण करण्याची केवळ घोषणाच केली नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील देशात सुरू आहे. शिर्डी शहरात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून लसीकरण चालू आहे; परंतु त्यामध्ये शिर्डी शहरातील नागरिकांना लस मिळण्यात अडचण येत आहे. शिर्डी शहराची लोकसंख्या जवळपास चाळीस हजार आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ १० ते १२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. काही दिवसांत साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी उघडणार आहे. त्यावेळी संसर्गाची भीती सर्वांत जास्त शहरातील नागरिकांना आहे, असे निवेदनात म्हटले आहे.