शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेजा-याचे मूल चोरणा-या दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी केली मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:15 IST

आपल्याला मुल होत नसल्याने शेजारचे नवजात मूल चोरून आई-बाप बनण्याचे स्वप्न पाहणा-या एका दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.

शिर्डी : आपल्याला मुल होत नसल्याने शेजारचे नवजात मूल चोरून आई-बाप बनण्याचे स्वप्न पाहणा-या एका दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.शिर्डीलगत असणा-या शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या चारी लगत बाबर व गोंडगिरे हे कुटूंब एकमेकांचे चांगले शेजारी होते. दोन्हीही कुटूंबे साईबाबांच्या मुर्त्या विकून चरितार्थ चालवतात़ संजीव हरीभाऊ गोंडगिरे यांना एक साडेतीन वर्षाची मुलगी आहे. त्यांना नुकताच एक मुलगा झाला. ३ जानेवारी रोजी गोंडगिरे यांचे शेजारी असलेल्या सुरेश बाबर व पुजा बाबर यांनी गोंडगिरे यांचा पाच वर्षाचा मुलगा चोरुन शिर्डीतून पलायन केले. आपलं मुल म्हणून याला वाढवू व कोठेही काम करून चरितार्थ चालवू या कल्पनेने या दाम्पत्याने चेंबूर गाठले. दरम्यान संजीव गोंडगिरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस नाईक प्रशांत दिनकर, किरण कु-हे, राजेंद्र बर्डे यांच्या पथकाने बाबर दाम्पत्याला मुलासह काल ताब्यात घेतले. यामुळे पुजा बाबर यांचा आई होण्याचा आनंद क्षणिक ठरला. अकरा दिवसांचे त्यांचे मातृत्वही संपुष्टात आले. आरोपी व बाळाला शिर्डीत आणण्यात आले असून आरोपींची रवानगी कोठडीत करण्यात आली. तर बालकाला त्याच्या आईकडे सोपविण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षा लोकडे करीत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी