शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:49 IST

बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

शिर्डी : दुष्काळ, बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यात राज्यातील व देशातील जास्तीत जास्त वधू वरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोहळ्याचे निमंत्रक स्वागताध्यक्ष, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आयोजक कैलास कोते यांनी केले आहे.सोळा वर्षांपासून माजी नगराध्यक्ष कैलास कोते व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते या सोहळ्याचे आयोजन करतात. आजवर या माध्यमातून सतराशे जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. या सोहळ्यात आयोजकांच्या वतीने वधू वरांना पोषाख, साडी, वधुसाठी मंगळसूत्र, संसारोपयोयी वस्तू, साईंची प्रतिमा तसेच व-हाडी मंडळींसाठी मिष्टान्न भोजन देण्यात येते. तसेच वरांची साईदर्शनानंतर शिर्डी गावातून घोडे, उंट व सजविलेल्या वाहनांतून ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात येते़ या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू वरांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी