शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत ब्रॅण्डेड चप्पलचोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 11:32 IST

साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिर्डी : साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.गणेश वारूडकर असे या पंचेचाळीस वर्षीय भामट्याचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, रेल्वे येथील रहिवासी आहे. तो येथून चोरलेले बूट गावी विकत होता. २१ तारखेपासून तो संस्थानच्या साई उद्यान भक्त निवासात लॉकर घेऊन राहात होता. आरतीच्या वेळी भाविक मंदिरात बराच वेळ जातात. ती संधी साधून तो ब्रॅन्डेड चप्पल, बूट चोरून लॉकरमध्ये नेऊन ठेवत असे. बुधवारी दुपारच्या आरतीच्यावेळी त्याने नेहमीप्रमाणे चप्पल, बूट चोरले.  त्याचवेळी चप्पलाचा मालक असलेल्या दोन महिला आरतीतून बाहेर पडल्या.  त्यांनी या चोरट्याला चप्पल चोरताना पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग केला. तो साई उद्यानमध्ये गेल्यावर महिलांनी सुरक्षारक्षकांना सांगितले. सुरक्षारक्षकांनी त्याला हटकताच तो पळून गेला.संस्थानचे सुरक्षा प्रमुख पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तेथील रूम व लॉकरचे रेकॉर्ड तपासले असता या आरोपीच्या १४४ क्रमांकाच्या लॉकरमध्ये ६० चप्पल व १५ बूटाचे जोड आढळले. लॉकर घेताना आरोपीने आधार कार्ड व मोबाईल नंबर दिला होता. त्यानुसार मोबाईल लोकेशन व आधार कार्डवरील फोटोच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. रात्री आठ वाजता संस्थान प्रसादालयात तो आढळून आला. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पाकीटमारीबरोबरच भाविकांच्या चप्पल व बूट चोरीला जाण्याचे मोठे प्रमाण आहे. त्यात काही टोळ्याही सक्रिय असल्याची चर्चा आहे. यात लाखोंची उलाढाल होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी चेन्नईच्या एका महिला भाविकाचे बूट चोरीला गेल्याने तिने पोलिसात तक्रार दिली होती. तसेच संस्थानकडून सीसीटिव्ही फुटेजही मिळवले होत, मात्र याबाबत कोणीही गंभीरपणे घेतले नव्हते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी