श्रीरामपूर शहरानंतर तालुक्यात शिरसगाव येथे प्रथमच शासकीय योजनेमधून ग्रामस्थांना पिण्यासाठी फिल्टर पाणी मिळणार आहे. येथील परिसरातील आरटीओ कार्यालयालगत जागेमध्ये मोठे तलावाचे काम सुरू आहे. पिण्याचे पाणी ग्रामस्थांना तलावांमधून सुरू करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा तळ्यामध्ये पाटाचे पाणी सोडण्यात आले आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या प्रयत्नातून तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हे काम शक्य झाले असल्याची माहिती सरपंच आबासाहेब गवारे यांनी दिली आहे. यावेळी अशोक कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश गलांडे, कोंडीराम उंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी गायकवाड, हिम्मत धुमाळ, रामभाऊ कसार, ग्रामविकास अधिकारी बी. एस. म्हस्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गवारे यांनी केले तर आभार सरपंच आबासाहेब गवारे यांनी मानले.