शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव : पोलिसांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 09:00 IST

अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा केला आरोप 

शेवगाव (जि. अहमदनगर) : गेवराईकडे प्रवशी घेऊन निघालेल्या एसटी बसला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतांना डबल ट्रॉली ट्रॅक्टरने कट मारल्याने बसचे नुकसान झाले आहे. सदर प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज घेण्यात पोलिसांनी टाळाटाळ केल्याने, संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत संप पुकारला आहे. 

फिर्याद घेण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ रात्री बारा वाजेपासून शेवगाव आगारातील चालक-वाहकांनी शेवगाव बस आगार बंद केला आहे. याबाबत माहिती अशी की, काल मंगळवारी शेवगाव आगाराची शेवगाव-गेवराई बस क्रमांक एमएच १४ बीटी ११५५ चापडगाव येथे आरोग्य केंद्राजवळ प्रवाशी उतरवण्यासाठी थांबलेली असताना, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या डबल ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरचा कट एसटी बसला लागला. ट्रॉलीच्या हेलकाव्यात बसच्या डाव्या बाजूचा आरसा फुटून नुकसान झाले. 

याबाबत चालकाने शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित ट्रॅक्टर चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार अर्ज दिला होता. मात्र पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल करुन घेतला नाही. अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिलीप लबडे यांनी दिली आहे. रात्री उशिरा पर्यंत आगाराचे कर्मचारी गुन्हा दाखल करावा अथवा तक्रार अर्ज तरी घ्यावा म्हणून शेवगाव पोलीस ठाण्यात थांबले होते. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने याचा निषेध म्हणून शेवगाव आगाराच्या चालक-वाहकांनी रात्री पासून एसटी बस आगार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लबडे यांनी सांगितले.

एसटी बसला डॅश मारणारा ट्रॅक्टर हा शेवगाव तालुक्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा असल्याची चर्चा असून त्यामुळे पोलिसांनी राजकीय दाबावातून ट्रॅक्टर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल न केल्याची चर्चा आहे. दुपारपर्यंत तक्रार अर्ज दाखल करून घेण्यास पोलीस अनुकूल होते. मात्र नंतर सूत्रे फिरली आणि पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल केला नाही अशी चर्चा सुरु आहे. 

राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी दिवाळी पासून राज्यातील बहुतांशी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. अशात शेवगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर रुजू झाले. चालक-वाहक कामावर हजर झाल्याने तुरळक बस सेवा सुरू असल्याने प्रवाशांना आधार मिळाला आहे. यापूर्वी अनेक घटनामध्ये शेवगाव पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच यात अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेशही असल्याचं म्हटलं जातंय. 

शेवगाव आगारातील वाहक-चालक जीव धोक्यात टाकून प्रवाशांना सेवा देत असताना पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. जो पर्यंत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत शेवगाव बस आगार शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार आहे.दिलीप लबडे, कामगार नेते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र