अतिवृष्टीग्रस्त भागाची शेलार यांच्याकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:40+5:302021-09-05T04:25:40+5:30

नगर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी आगडगाव, रतडगाव, देवगाव परिसरात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्यांना पाणी आल्यामुळे ...

Shelar inspects the flooded area | अतिवृष्टीग्रस्त भागाची शेलार यांच्याकडून पाहणी

अतिवृष्टीग्रस्त भागाची शेलार यांच्याकडून पाहणी

नगर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी आगडगाव, रतडगाव, देवगाव परिसरात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्यांना पाणी आल्यामुळे पिके वाहून गेली. बंधारे फुटले. नदी काठच्या संरक्षण भिंती वाहून गेल्या. पुलाचे कठडे तुटले, पूल खचले. रतडगाव येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दोन दिवस बंद झाली. देवगाव येथील बंडू गायकवाड यांचे अर्धा एकर क्षेत्र पूर्णपणे वाहून गेले. जनावराचे गोठे पडले. सीताफळाची बाग, झेंडूची शेती, बाजरी, सोयाबीन सारखे पीक उद्ध्वस्त झाले. रतडगाव येथील स्मशानभूमीचे पत्र्याचे शेड पूर्णपणे पडले. मात्र, तहसीलदारांचा आदेश नसल्याचे पंचनामे झाले नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.

शेलार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी पंचनाम्याबाबत चर्चा केली असता तलाठी यांना उद्यापासून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक एकत्रित पंचनामा करणार असल्याचे सांगितले. यावेळी केशव बेरड, रोहिदास कर्डिले, विठ्ठल वामन, बाबा पगारे आदी उपस्थित होते.

..........

फोटो - रतडगाव (ता. नगर) येथे झालेल्या अतिवृष्टीत वाहिलेल्या स्मशानभूमीची पाहणी करताना घनश्याम शेलार.

Web Title: Shelar inspects the flooded area