जामखेड: शहरातील सदाफुले वस्ती येथे अनैतिक संबंधातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी सादीक शेख याला सोमवारी येथील प्रथम वर्ग न्यायालयात पोलिसांनी हजर केले़ न्या़ अहमद मुजावर यांनी त्यास २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़येथील सदाफुले वस्तीवर रविवार (दि़ २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी सादीक शबास शेख याने पत्नी महेमुदा व तिचा प्रियकर सईद शेख यांची अनैतिक संबंधातील संशयावरून सत्तूरसारख्या धारधार हत्याराने वार करीत चेहऱ्यावर दगड घालून हत्या केली होती.पोलिसांनी सादीक शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच गुन्ह्याची कबुली दिली़ पोलिसांनी सोमवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश अहमद मुजावर यांनी त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ आरोपीतर्फे अॅड. हर्षल डोके यांनी युक्तिवाद केला़(तालुका प्रतिनिधी)
शेखला पाच दिवसांची कोठडी
By admin | Updated: September 22, 2015 00:24 IST