शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भेंड्यात मंदिरातील दानपेटी पळवली, सराफाचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:50 IST

भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला. चोरांनी ग्रामदैवत नागेबाबा मंदिरातील दानपेटी पळविली, तर नागेबाबा मंदिर रस्त्यावरील एका सराफाचे दुकान फोडले.

 भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला. चोरांनी ग्रामदैवत नागेबाबा मंदिरातील दानपेटी पळविली, तर नागेबाबा मंदिर रस्त्यावरील एका सराफाचे दुकान फोडले.सोमवारी (दि.१८) पहाटे ३ वाजता पुजारी अशोक परशराम गव्हाणे व विलास शिरोळे हे मंदिरात साफसफाईसाठी आले होते. त्यावेळी त्यांना मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. मंदिरात पाहिले असता दानपेटी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ ही घटना मंदिर विश्वस्त व गावक-यांच्या निदर्शनास आणून दिली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रविवारी रात्री १ वाजून १३ मिनिटांनी ६ चोरांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आणि सुमारे १५ मिनिटे मंदिरात असल्याचे स्पष्ट दिसते. यावेळी चोरांनी ३५ हजार रूपये किंमतीची दानपेटी व रक्कम अंदाजे ६५ हजार रूपये, असा १ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मागील महिन्यात दानपेटी उघडून त्यातील रक्कम बँकेत जमा केली होती. दुस-या घटनेत नागेबाबा मंदिर रस्त्यावर असलेले सागर पंडित यांच्या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली. यात अडीच किलो चांदीचे दागिने अंदाजे एक लाख रूपयांचा माल चोरीला गेल्याची माहिती पंडित यांनी दिली.नागेबाबा मंदिरातील दानपेटीच्या चोरीची तीन वर्षांनी पुनरावृत्ती झाली. यापूर्वी ४ आॅगस्ट २०१६ रोजी नागेबाबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून अज्ञातांनी मंदिरातील दानपेटी, सीसीटीव्ही कॅमेरा मशीन (डीव्हीआर) व रोख रक्कम असा ८९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरtheftचोरी