पिंपळगाव माळवी : नगर लुक्यातील डोंगरगण येथील गट नं.१७५, १६४, १५३ येथील डोंगरगण-जेऊर जुना रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. महसूल विभागाच्या सप्तपदी अभियानांतर्गत नुकताच हा रस्ता खुला करण्यात आला.
गाव नकाशावरील रस्त्याच्या सामायिक वादात प्रांताधिकारी यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत मोजणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खुला करण्यात आला. रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. या रस्त्यावरील अतिक्रमित पिकात मोजणी केल्यानंतर जेसीबी फिरवल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते. रस्ता खुला करत असताना काही शेतकऱ्यांनी विरोध केला. रस्त्यावरून दोनशे शेतकऱ्यांना वहिवाट करण्यास मोकळीक झाली आहे.
रस्ता खुला करण्याच्या वेळी जेऊर मंडलाधिकारी वृषाली करोसिया, डोंगरगण तलाठी वर्ष शिंदे, पाेलीस उपनिरीक्षक महानवर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.