शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

वाचन संस्कृतीचा वाटाडया; ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:42 IST

४० वर्षापूर्वी राहुरी येथील सामान्य कुटुंबातील मुरलीधर नवाळे यांनी ग्रंथपाल म्हणून राहुरी नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन संस्कृती वाढविण्याचा श्रीगणेशा केला़. नवाळे यांनी अहमदनगर जिल्हयातील विशेषत: ग्रामीण भागात १५० ग्रंथालय सुरू करण्याची प्रेरणा दिली़. त्यातून लाखो वाचकांचा वाटाडया होण्याची संधी मिळाली़ वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी खास संवाद साधला. 

वाचन प्रेरणा दिन विशेष / भाऊसाहेब येवले  राहुरी : शिक्षणाअभावी समाजामध्ये वाचकांची संख्या दुर्मिळ होती़ ठराविक व्यक्ती वृत्तपत्र व कथा कादंब-या वाचायचे. अशा अंगठेबहाद्दर परिस्थितीत ४० वर्षापूर्वी राहुरी येथील सामान्य कुटुंबातील मुरलीधर नवाळे यांनी ग्रंथपाल म्हणून राहुरी नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन संस्कृती वाढविण्याचा श्रीगणेशा केला़. नवाळे यांनी अहमदनगर जिल्हयातील विशेषत: ग्रामीण भागात १५० ग्रंथालय सुरू करण्याची प्रेरणा दिली़. त्यातून लाखो वाचकांचा वाटाडया होण्याची संधी मिळाली़ वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी खास संवाद साधला. ग्रंथपाल म्हणून नोकरीची सुरवात कधी केली?मुरलीधर नवाळे : जुनी अकरावी परीक्षा दिल्यानंतर वाचनालयात ग्रंथपाल म्हणून नोकरीला सुरूवात केली़. त्यावेळी नगर परिषदेत १८०० पुस्तके होती़. वाचनालयाचा दर्जा ‘ड’ होता़ वाचनालयात पुस्तकांची संख्या २७ हजारावर नेऊन वाचनालयास तालुका ‘अ’ वर्ग प्राप्त करून दिला़. तत्कालीन नगराध्यक्ष ल़. रा़. बिहाणी यांच्यामुळे ग्रंथपाल म्हणून काम करण्याची प्रभावी संधी मिळाली़.ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी काय परिश्रम केले?मुरलीधर नवाळे : जिल्हाभर वाचक चळवळ वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाचा ग्रंथालय संचानालय ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग राहुरी येथे २० वर्ष घेतला़ त्यातून हजारो विद्यार्थी पुढे ग्रंथपाल म्हणून उदयास आले़. ग्रंथालय स्थापन करण्यासाठी गावोगावी जाऊन ग्रंथपालांना मार्गदर्शन केले़. शासन दरबारी प्रयत्न करून मान्यता मिळवून दिली़. त्यामुळे वाचन संस्कृती गावोगावी उभी रहाण्यास मदत झाली़. धर्मदाय आयुक्तांकडे संस्था स्थापण्यासाठी पाठपुरावा केला़. त्यामुळे १५० ग्रंथालयांना शासकीय मान्यता मिळाली. तसेच त्यांना अनुदान मिळाले़उत्कृष्ट कामाचे काही बक्षीस?मुरलीधर नवाळे : दरवर्षी होणाºया जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर होणा-या ग्रंथालय आधिवेशनामध्ये सक्रीय सहभाग घेतो. वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथपालांना वेतनवाढ, वाचनालय अनुदानात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले़. वाचन संस्कृतीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबददल एस़. आऱ. रंगनाथन यांच्या नावाने दिला जाणारा शासनाचा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त झाला़. 

ग्रंथपालांचे प्रश्न काय आहेत?मुरलीधर नवाळे : शासकीय उदासीनतेमुळे ग्रंथालयांना मान्यता मिळत नाही़ दर्जा बदल होत नाही़. त्यामुळे ग्रंथपालांच्या वेतनात वाढ होत नाही़. कमी पगारावर चांगले ग्रंथपाल उपलब्ध होत नाही़. शासनाने अनुदानात भरीव वाढ मिळावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत़. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लुप्त पावत आहे़. शासन एकीकडे ए़. पी़. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन पे्ररणा दिन म्हणून साजरी करीत असते़. मात्र दुस-या बाजुला ग्रथालयांना शासकीय छायाछत्र व लोकसहभाग पुरेसा मिळत नाही. अधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अमेरिकासारखया देशात वाचनालयांना प्रोत्सहन दिले जात आहे़. त्याच पध्दतीने देशात व राज्यात वाचनालयांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

टॅग्स :libraryवाचनालयAhmednagarअहमदनगर