शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार महिलांनी नाकारला बाळाचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:32 IST

अण्णा नवथर अहमदनगर : मूल नको असल्याने होणाऱ्या गर्भपातात चालू वर्षी तिपटीने वाढ झाली असून, जिल्ह्यातील सात हजार मातांनी ...

ठळक मुद्देगर्भपातात तिपटीने वाढ: आरोग्य विभागाकडून कारणमीमांसा सुरु

अण्णा नवथरअहमदनगर : मूल नको असल्याने होणाऱ्या गर्भपातात चालू वर्षी तिपटीने वाढ झाली असून, जिल्ह्यातील सात हजार मातांनी चार महिन्यांच्या आतील बाळांच्या जन्मास थेट नकार देत गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाढत्या गर्भपाताची संख्या आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनला आहे.लिंग तपासणीला कायद्याने बंदी आहे. पण, गर्भधारणेनंतर बाळच नको, म्हणून गर्भपात करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले. सन २०१५ पासूनची आकडेवारी आरोग्य विभागाने संकलित केली. त्यानुसार २०१७-१८ या वर्षात ७ हजार १९५ गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने झाले आहेत. केंद्र शासनाच्या १९७१ च्या कायद्यानुसार वीस आठवड्यापर्यंतचा गर्भ काढून टाकण्यास मुभा आहे. या कायद्याच्या आधारे मूल नको, अशी इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केल्यास एक अर्ज भरल्यानंतर गर्भपात करून मिळतो. सन २०१५ ते १७, या काळात दरवर्षी दीड ते दोन हजारांपर्यंत गर्भपात झाले़ २०१८ मध्ये ही संख्या तिपटीने वाढली़ ती वाढण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, याचा शोध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.

वैद्यकीय सल्ल्याने झालेले गर्भपातसन २०१५ --- १८९५सन २०१६ --- १९४८सन २०१७ ---२०३९सन २०१८ --- ७१९५नगर शहरात सर्वाधिक गर्भपातहॉस्पिटल हब म्हणून ओळखल्या जाणा-या नगर शहरात खासगी रुग्णालयांत चालू वर्षी सर्वाधिक ५ हजार ७२७ गर्भपात झाले आहेत. मागील तीन वर्षांत हे प्रमाण अत्यल्प होते. चालू वर्षी एकदम तीन पटींनी त्यात वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय गर्भपातअकोला-९४, जामखेड-२४, कर्जत-१०, कोपरगाव-७, नगर-५ हजार, २२७, नेवासा-६०, पारनेर-२८, पाथर्डी-२, राहाता-२३०, राहुरी-११३, संगमनेर-९२, शेवगाव-५५६, श्रीगोंदा-१९, श्रीरामपूर-२३३ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालयahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषदahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका