शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तीन एकर डाळिंबातून सात लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:16 IST

ज्वारी, बाजरी, मका अशी पिके घेऊन त्यांचा उत्पादन खर्चही निघणे अनेकदा मुश्किल झाले. त्यातून भरीव असे काहीही होत नव्हते. अखेर नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी धाडस करून आपल्या शेतात ३ एकरांवर ९५० डाळिंब झाडे लावायचा निर्धार केला. यातून त्यांनी सात लाखांचे उत्पन्न मिळविले

सुहास पठाडेज्वारी, बाजरी, मका अशी पिके घेऊन त्यांचा उत्पादन खर्चही निघणे अनेकदा मुश्किल झाले. त्यातून भरीव असे काहीही होत नव्हते. अखेर नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी धाडस करून आपल्या शेतात ३ एकरांवर ९५० डाळिंब झाडे लावायचा निर्धार केला. यातून त्यांनी सात लाखांचे उत्पन्न मिळविले.डाळिंबाच्या या झाडांसाठी ७५ लाख लिटर पाणी साठवण क्षमतेच्या शेततळ्याची १६ गुंठ्यांवर निर्मिती केली. त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला. गेल्या अडीच वर्षांत अनेक अडचणींचा सामना करीत तालुक्यातील मुकिंदपूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी डाळिंब बागे चा प्रयोग यशस्वी केला. त्यातून डाळिंब रोपांची लागवड केली असून, त्यानंतर उर्वरित दोन एकरांत आंबा प्रयोग त्यांनी राबविला. या नव्या बागेतील आंतरपीक म्हणून पेरू, लिंबू, चिक्कू, कढीपत्ता, नारळ, आवळा लागवडीही त्यांनी केली. शेतीत असे वेगवेगळे प्रयोग करून प्रयोगशील शेतीचा आदर्श निर्माण केला असून, या सर्वांतून नऊ लाखांचे उत्पन्न मिळविले.जिरायती शेतात ज्वारी सारखे पीक घाडगे घेत होते. दरम्यान जिल्ह्यातील राजुरी येथील डाळिंबरत्न डॉ. बाबासाहेब गोरे यांनी डाळिंब लागवडीचा सल्ला देऊन मार्गदर्शनाची तयारीही दाखविली. पण, या भागात कोणीही फळबाग अथवा डाळिंब बाग असा प्रयोग केलेला नव्हता. त्यामुळे मनात धाकधुक होती. पण एकदा डाळिंबाचा प्रयोग करायचाच, असा निर्धार त्यांनी केला. भगवा जातीची ९५० रोपे आणून तीन एकरांवर लागवड केली. दोन झाडांतील अंतर ९ बाय १४ फूट ठेवून त्याला ठिबक केले. पहिले दीड वर्षे त्याच्यामध्ये आंतरपीकही घेतले. त्यामुळे शेत रिकामे राहिले नाही. डाळिंब रोप लागवडीनंतर पहिला बहार (फळ) २४ महिन्यांनंतर धरायचा असे त्यांनी ठरविले. त्यानुसार झाडाची वाढ चांगली व्हावी, यासाठी घाडगे हे दररोज शेतात जाऊन झाडांची पाने पाहायचे. त्यावरून त्यांना रोगाचा अंदाज यायचा. त्वरित औषध फवारणीचा त्यांना फायदाच झालाय, परंतु त्यामुळे खर्चही अधिक झाला. अगदी सुरुवातीपासूनच रासायनिक खतांबरोबरच शेणखतही मोठ्या प्रमाणावर वापरले. रासायनिक खते ठिबकद्वारेच देण्याला प्राधान्य दिले. बहार (फळ) धरल्यापासून त्यांची खरी कसरत सुरू झाली. दररोज शेतात जाऊन फुलांच्या होणाऱ्या वाढीवर बारकाईने नजर ठेवत होते. त्यातच परिसरात एकही डाळिंब बाग नसल्याने इतर रोगांचा प्रादुर्भावही झाला नाही. त्याचा फायदा उत्पादन वाढण्यात झाला. एका झाडाला सुमारे साठ ते सत्तर इतके फळे लागली आहेत. एका फळाचे वजन अंदाजे ३०० ते ६०० ग्राम इतके असून, १२ टन माल निघाला. त्यामुळे पहिल्याच बारमधून ७ लाखांचे उत्पादन मिळाले असून, अनेक व्यापाºयांनी डाळिंबाची पाहणी केली.यामधून तब्बल चार ते साडेचार महिन्यांत डाळिंबासंदर्भात बारकावे माहीत झाले. त्याचा फायदा पुढील बारमधील डाळिंब उत्पादन वाढीवर होईल, असा अंदाज आहे. शेतीचा खरा पाणीप्रश्न मार्चपासून सुरू होतो. त्यावेळी उन्हाची तीव्रताही वाढलेली असते. त्यामुळे पाणीही अधिक लागते. त्याचा विचार करून तीन ते चार लाख रुपये खर्च करून १६ गुंठ्यांमध्ये शेततळ्याची निर्मिती केली. त्याची पाणी साठवण क्षमता ७५ लाख लिटर आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या टेन्शनमधून ते मुक्त झाले आहेत. संपूर्ण पाच एकरांत एकूण १३०० झाडांची लागवड केली असून, यामध्ये दोन एकरांत २५ आंबे, २५ लिंबू, २५ चिक्कू, १० पेरू, १०० नारळ, ५ आवळ्याची झाडे असून, यातून दरवर्षी २ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. डाळिंबातून ७ लाखांचे असे एकूण ९ लाखांपर्यंत या क्षेत्रातून आम्ही उत्पन्न घेतले आहे. तरी तरुण शेतकºयांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केल्यास मोठे उत्पन्न मिळेल, असे प्रगतिशील शेतकरी संजय घाडगे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी