शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गिरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधारासह सात जेरबंद; आठ वर्षांपासून होता आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 14:58 IST

शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रवींद्र अप्पासाहेब शेटे व विजय बाळासाहेब खर्डे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून तर त्यांना मदत करणा-या इतर पाच जणांना नाशिक, औरंगाबाद, शिर्डी परिसरातून अटक केली. शेटे हा गेल्या आठ वर्षांपासून फरार होता. 

अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रवींद्र अप्पासाहेब शेटे व विजय बाळासाहेब खर्डे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून तर त्यांना मदत करणा-या इतर पाच जणांना नाशिक, औरंगाबाद, शिर्डी परिसरातून अटक केली. शेटे हा गेल्या आठ वर्षांपासून फरार होता. गिरे यांची १५ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी भोजडे (ता. कोपरगाव) येथे रवींद्र शेटे व त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडत, तसेच कोयत्याने वार करून हत्या केली होती. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने १८ मार्च रोजी नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश मोहन गिरी  यांना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शेटे व खर्डे हे मात्र फरार होते. हे दोघे धुळे येथे लपले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़. माहितीनुसार पथकाने धुळे येथे जाऊन दोघांना अटक केली. हत्याकांडात आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे अमोल सोपानराव मते (रा़ दुर्गानगर, वैजापूर), साईनाथ वाल्मिक मते (रा़ पारेगाव येवला), रवींद्र जालिंदर मगर(वय २५ रा.संवत्सर, कोपरगाव), लोकेश राय्यप्पा मुद्दापूर (वय २६ रा़चाकण जि़ पुणे), सुनील पंढरीनाथ नागवे (वय २९ रा़सोमठाण जि़ जालना) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़ प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरीक्षक देशमुख, गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार नानेकर, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळिक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, राम माळी, शंकर चौधरी, संतोष लोढे, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रविकिरण सोनटक्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पॅरोल रजेवरील आरोपीचाही सहभाग रवींद्र शेटे व मयत सुरेश गिरे यांच्यात पूर्ववैमनस्यातून अनेकदा भांडणे झाली. सन २०१२ मध्ये रवींद्र शेटे व त्याच्या साथीदारांनी सुरेश गिरे यांचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहरी शिनगर याचा खून केला होता. या गुन्ह्यात रवींद्र शेटे याचा भाऊ किरण शेटे याला जन्मठेपेची शिक्षा झालेली असून काही दिवसांपूर्वी त्याला येरवडा कारागृहातून पॅरोल रजा मिळाली होती. किरण याचाही गिरे यांच्या हत्याकांडात सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारी