गटविकास अधिकारी सचिन सूर्यंवशी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष विधाते, पोहेगावचे आरोग्य आधिकारी डाॅ. नितीन बडदे उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी पाच रुग्ण या ठिकाणी दाखल झाले आहेत. विलगीकरणासाठी सध्या ५० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहेत. विलगीकरण कक्षासाठी डाॅ. विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली डॅा. सुनील शिंदे, डाॅ. प्रशांत दिघे, डाॅ. ललीतकुमार नळे, डाॅ. स्वप्निल सांगळे हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. चहा, नाश्ता व शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.
परिसरातील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरी न थांबता या ठिकाणी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. त्यामुळे संसर्ग जास्त पसरणार नाही. ग्रामपंचायती व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. प्रशासन विलगीकरण कक्षास सहकार्य करील, असे आश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी यावेळी दिले.