शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे वाघ मातोश्रीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 11:14 IST

महापालिकेत शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे़

अहमदनगर : महापालिकेत शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे़ सेनेचे नगरसेवक शनिवारी मातोश्रीवर हजर राहणार असून, त्यांच्या उपस्थितीतच सेनेचे मंत्री भाजपाशी चर्चा करणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले़ युतीसह महापौर पदाचा निर्णयही मातोश्रीवरच होणार आहे़महापौर निवडणुकीत भाजपाला सोबत घेण्याची तयारी शिवसेनेने दाखविली आहे़ सेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी गुरुवारी चर्चा केली़ चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय झाला़पण, मुख्यमंत्री संसदीय अधिवेशनानिमित्त दिल्लीत होते़ ते शुक्रवारी मुंबईत परतले़ त्यांच्याशी पालकमंत्री शिंदे चर्चा करणार आहेत़ दरम्यान मातोश्रीवर शनिवारी उपस्थित राहण्याचा निरोप गुरुवारी सेनेच्या नगरसेवकांना मिळाला़ उपनेते अनिल राठोड यांच्यासह गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाले़ शनिवारी सकाळी उर्वरित नगरसेकही मातोश्रीवर पोहोचतील़ सेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नगरसेवकांना शनिवारी सकाळी ११ वाजेची वेळ दिलेली आहे़ यावेळी सेनेचे मंत्री नगरमध्ये युती करण्याबाबत भाजपाच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असून, महापौर पदाबाबतही चर्चा होणार आहे़ सेना-भाजपाची युतीबाबत जुळवाजुळव सुरू झाली आहे़ पण, राष्ट्रवादीच्या गोटातही सत्ता स्थापनेच्या हलचाली सुरू झाल्या आहेत़ राष्ट्रवादीकडे स्वत:चे १८ नगरसेवक आहेत़ काँग्रेसचे ५, असे मिळून त्यांची संख्या २३ होते़ बसपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले़ याशिवाय भाजपाचे काही नगरसेवकही राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत़ मात्र यासंदर्भातला निर्णय स्थानिक पातळीवर न घेता तो वरिष्ठ पातळीवर होणे अपेक्षित आहे़ वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदिल मिळाल्यास राष्ट्रवादीही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो़ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी स्थानिक नेत्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते़ परंतु, महापालिकेतील सत्ता स्थापनेला अगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने वरिष्ठनेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़महापौर निवडणुकीचा प्रस्ताव सादरमहापौर व उपमहापौर निवडणुकीसाठीचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्तांना शुक्रवारी सादर केला़ विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका