शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:50 IST

दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देश्रेयासाठी राजकीय चढाओढश्रमदानात फक्त तीनचारच गावे आघाडीवर

केडगाव : दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.जलयुक्त योजनेत पहिल्या वर्षी तालुक्यातील १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा या योजनेत समावेश झाला. या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली. नदी खोलीकरण, रुंदीकरण, समतलचर, बांध बंधिस्ती, दगडी बंधारे अशा कामांचा यात समावेश आहे. आता सन २०१८ -२०१९ या वषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत या योजनेसाठी गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. आता तालुक्यातील जवळपास सर्वच गावांची या योजनेसाठी निवड झाल्याने दुष्काळाच्या झळा वषार्नुवर्षे सोसणा-या तालुक्याला आता दुष्काळाच्या शापातून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.हि शासकीय योजना असूनही गावांचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांची आज मोठी चढाओढ लागली होती. अगदी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सोशल मिडीयाचा आधार घेत या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आमच्यामुळेच इतक्या गावांचा जलयुक्त योजनेत समावेश झाल्याचे राजकीय श्रेय लाटण्याच्या पोस्ट दिवसभर सोशल वर फिरत होत्या.सध्या तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरु आहे. २५ गावांचा सहभाग असला तरी जेमतेम चार ते पाच गावातच सध्या श्रमदानाचे काम सुरु आहे. गुंडेगावने यात आघाडी घेतल्यानंतर आता सारोळा कासार, मजले चिंचोली, मांजरसुंबा, डोंगरगण या सारखी बोटावर मोजण्याइतकी गावे सरकारी योजनेवर अवलंबून न राहता श्रमदानाच्या माध्यमातून आपले गाव पाणीदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.या गावांचा झाला नव्याने समावेशबु-हाणनगर, निंबोडी, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी पारगाव, देवगाव, खांडके, माथनी, मेहेकरी, पारेवाडी, दशमी गव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे,टाकळी काझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर, रतडगाव, बारा बाभळी, सोनेवाडी (पिला), जांब, नागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक, देहेरे, कोळपे आखाडा, विळद, खारे कजुर्ने, शिंगवे नाईक, इस्लामपूर, नांदगाव, सोनेवाडी(चास), हमिदपूर, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, दरेवाडी, खंडाला, वाळूंज, आंबीलवाडी, गुणवडी, राळेगण म्हसोबा, मठपिंप्री, नारायणदोहो, शिराढोण, वाकोडी, बुरूडगाव, अरणगाव.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार