शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना पाहताच हातातील तलवार फेकून त्याने ठोकली धूम

By अण्णा नवथर | Updated: December 16, 2023 10:41 IST

पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केली.

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर :  रस्त्यात झालेल्या अपघाताच्या कारणावरून वाद घालत एकचं थेट रुग्णालयात तलवार घेऊन आला. ही खबर पोलिसांना मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांना पाहताच तलवार टाकून त्याने धूम ठोकली. हा प्रकार नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सीताराम श्रीराम खताळ वय-४८ (रा.सावेडी अहमदनगर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. 

त्याची रस्त्यात अपघात झाल्याने एकाशी वाद झाला होता त्यानंतर हा आरोपी घरी गेला. तो तलवार घेऊन दवाखान्यात आला. ही माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला. पोलिसांना पाहताच त्यांने हातातील तलवार फेकून दिली आणि तिथून पळून गेला. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त खबर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांनी कोतवाली पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता तलवार घेऊन फिरणारा युवक आढळून आला नाही. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसला. मात्र पोलिसांना खबर लागताच त्याने आपल्या हातातील तलवार हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेला. त्यानंतर गेटजवळ जाऊन पाहिले असता पोलिसांना त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाची त्याला केशरी रंगाची कडा असलेली म्यान व त्याच्या आतमध्ये टोकदार लोखंडी तलवार निदर्शनास आली. तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचे नाव विचारले असता सीताराम श्रीराम खताळ वय-४८ (रा.सावेडी अहमदनगर) असे सांगण्यात आले.तो इसम अपघातानंतर झालेल्या बाचाबाची नंतर वाद करण्यासाठी आला होता. कोतवाली पोलिसांनी सदरील तलवार जप्त केली. तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील प्रवीण पाटील, तनवीर शेख, गणेश धोत्रे, सलीम शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे,  गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी