शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणातून उद्यापासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 15:30 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

 राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याला असलेल्या लिकेजचा सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खाते अतिथीगृहात झालेल्या बैठकीत उन्हाळी आवर्तन पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रविवारपर्यंत ६ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात आले आहे. आवर्तन ४७ दिवस सुरू असूनही पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टेलच्या ५०० हेक्टर क्षेत्र अद्याप ओलिताखाली आणायचे आहे. आवर्तनाला गॅप न दिल्याने ६५० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार आहे. उजवा कालव्याचे आवर्तन २० मार्चला सुरू केले होते. दुसºया उन्हाळी आवर्तनासाठी चार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात येणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. बैठकीला मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सूचना केल्या. बैठकीस खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, महावितरणचे कार्य अधीक्षक अभियंता सांगळे, सायली पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी