कोपरगाव येथील संजीवनी फाऊंडेशन आयोजित सध्या संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर फाॅर सिव्हिल अँड डिफेन्स सर्व्हिसेस मार्फत सुरू असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षणार्थी युवकांना मार्गदर्शन करताना वाबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे होते. तसेच व्यासपीठावर संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, संगणक उद्योजक विजय नायडू, शिक्षण संचालक ज्ञानदेव सांगळे उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी ८६ प्रशिक्षणार्थींनी हजेरी लावली.
कोल्हे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांची नेहमी खंत असायची की, आपल्या तरुणांना सैन्यात संधी कमी मिळते, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर त्यांची सैन्य दलात निवड होण्याची संख्या वाढू शकते. या हेतूने त्यांनी १५ सप्टेंबर १९९२ रोजी संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर फाॅर सिव्हिल अँड डिफेन्स सर्व्हिसेस या सेवाभावी संस्थेची स्थापना केली.
फोटो१२ कोपरगाव
121220\wabale saheb.jpg
कोपरगाव येथे भरती पूर्व मार्गदर्शन करताना अरूण वाबळे. यावेळी व्यासपीठावर नितीन कोल्हे, सुमित कोल्हे, विजय नायडू व ज्ञानदेव सांगळे व्यासपीठावर उपस्थित होते.