निघोज : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक परिसरात शंकर हरिभाऊ येवले व विवेक सीताराम वाजे या दोन शेतकऱ्यांच्या कांदा रोपावर अज्ञात इसमाने गवत जाळण्यासाठी वापरण्यात येणारे तणनाशक फवारले. त्यामुळे कांदा रोपे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अगोदरच कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता अज्ञाताने असा खोडसाळपणा केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांद्याचे पहिले रोप पावसाने वाया गेले. बियाणे विकत घेऊन पुन्हा कांदा टाकला. रोप उगवले. मात्र, अज्ञाताने तणनाशक फवारल्याने रोप जळण्याच्या मार्गावर आहे. माजी सरपंच रेखा येवले, उपसरपंच गणेश सुकाळे, स्वाती नऱ्हे, रमेश वाजे, स्वराज युवा मंचाचे अध्यक्ष गणेश शेटे, पांडुरंग येवले, अनिल नऱ्हे आदींनी अशा अपप्रवृत्तींना पोलीस प्रशासनाने शोधून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खोडसाळपणा, कांदा रोपावर तणनाशक फवारणी
By | Updated: December 6, 2020 04:22 IST