शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच हेच गावचे शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 05:47 IST

देवेंद्र फडणवीस : ग्रामविकासासाठी राज्याची तिजोरी खुली करू

शिर्डी : सरपंच हेच गावचे खरे शिल्पकार असून ग्रामविकासाबाबत शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्याची तिजोरी खुली ठेवू. सरपंचाच्या उरलेल्या समस्या नव्या सरकारमध्ये मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले़ग्रामविकास विभागाच्या वतीने शिर्डीत सरपंच, उपसरपंचांच्या राज्यस्तरीय कार्यशाळा व परिषदेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, राज्यमंत्री दादा भुसे आदींसह ५० हजार सरपंच-उपसरपंचांची उपस्थिती होती़

सरपंचांची मानधन वाढ हा तर ट्रेलर आहे़ पिक्चर अभी बाकी है, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीत सरपंचाचे प्रतिनिधी घेण्यात येतील. तसेच पुरस्कारही सुरू करण्यात येतील. उपसरपंचांना मानधन सुरू केले आहे. सदस्यांनाही बैठकीचा भत्ता वाढविण्यात येईल. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अभ्यास समिती नियुक्त केली जाईल. सरपंचांच्या थेट निवडीच्या रुपाने त्यांना सन्मान मिळवून दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला़मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच वर्षात तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. सरकारशी संलग्न राहण्यासाठी कायदेशीर सरपंच परिषद तयार करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिल्या़पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता आमच्यासाठी नसून सामान्यांच्या सेवेसाठी आहे़ आमची भूमिका मान्य झाली म्हणून सरपंचांची मोठी गर्दी झाली़ गावातला माणूस गावात कसा राहिल यासाठी काम करायला हवे. अनेक योजनांमुळे गावांची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक योजना आजही सुरू आहेत़ मात्र ज्या योजना काही कामाच्या नाहीत त्या बंद केल्या़ड्रोनद्वारे गावठाण मोजणीला पावसाचा अडथळाड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिर्डीतून करण्यात आला़ पावसामुळे मात्र ड्रोन उडालेच नाही़ त्यामुळे प्रात्यक्षिक न करताच उद्घाटन पार पडले़ दीड वर्षांत जीआयएस मॅपिंगद्वारे काम पूर्ण होऊन प्रत्येकाला प्रॉपर्टीचा दाखला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले़मुख्यमंत्री-ग्रामविकास मंत्र्यांची एकमेकांवर स्तुतीसुमनेपंकजा मुंडे यांचे ग्रामविकासाचे काम अत्यंत चांगले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर मुंडे यांनीही विकासाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना देत विकासासाठी अपेक्षा व मागणीपेक्षाही अधिक निधी देतात, असे सांगितले़ राधाकृष्ण विखे यांच्या नावासमोरुन नामदार कधी हटलेच नाही. ते इकडे आल्याने चांगले झाले ते आमच्या कुटुंबातील असल्याचे त्या म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhmednagarअहमदनगरsarpanchसरपंच