खर्डा : खर्डा (ता.जामखेड) येथील ऐतिहासिक किल्ल्यासमोरील मैदानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खर्डा किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण दरवर्षी केले जाते. त्यापूर्वी येथील जागेवर वाढलेले गवत, इतर कचरा, मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. या संदर्भात आमदार रोहित पवार विचार मंचाचे अध्यक्ष कार्यकर्ते, खर्डा येथील क्रांतिवीर करिअर अकॅडमीच्या युवकांनी पुढाकार घेतला. मंचचे अध्यक्ष दत्तराज पवार यांनी गवत काढण्यासाठी फळीचा ट्रॅक्टर, कचरा गोळा करण्यासाठी चार चाकी मालवाहतूक टेम्पोची सोय केली. त्यामुळे किल्ल्यासमोर पटांगणातील वाढलेले गवत काढण्यात आले. या मोहिमेत सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, जाधव मेजर, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, महालिंग कोरे, अशोक खटावकर, प्रकाश गोलेकर, दादा जावळे, विकास शिंदे, भीमा घोडेराव, राजू लोंढे, नितीन गोलेकर, ज्ञानेश्वर इंगोले, संतोष लष्करे, सचिन वानरे, निखिल जगताप आदी उपस्थित होते.
खर्डा किल्ला मैदानात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST