आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ८- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत, विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करीत असताना, गोंधळ घातल्याबद्दल निलंबित केलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप यांच्यावरील निलंबनाची कारवाई आज मागे घेण्यात आली़ जगताप यांच्यासह भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, अमर काळे, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सकपाळ, कुणाल पाटील, जयकुमार गोरे यांचे निलंबन मागे घेण्यात आले. आमदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही, तोपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेतील कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
संग्राम जगताप, राहुल जगताप यांचे निलंबन मागे
By admin | Updated: April 8, 2017 15:30 IST