शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संगमनेरी पॅटर्न फेमस; ६०० कामगारांना केली घरी जाण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:21 IST

 परराज्यात जाणा-या ट्रकला भाडे ठरवून ६०० कामगारांची घरी जाण्याची व्यवस्था तर केली़ बरोबर जेवण आणि पाण्याचे बॉक्स देऊन कामगारांना निरोप देण्यात आला. राष्ट्रवादी युवकचा हा संगमनेरी पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे. इतर तालुक्यांतही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले़.

अहमदनगर : संगमनेरमधून मध्यप्रदेश व बिहारकडे जाणा-या परप्रांतिय कामगारांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार धावून आले. परराज्यात जाणा-या ट्रकला भाडे ठरवून ६०० कामगारांची घरी जाण्याची व्यवस्था तर केली़ बरोबर जेवण आणि पाण्याचे बॉक्स देऊन कामगारांना निरोप देण्यात आला. राष्ट्रवादी युवकचा हा संगमनेरी पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे. इतर तालुक्यांतही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले़. लॉकडाऊन काही अंशी शिथिल करीत राज्य सकरारने कामगारांना घरी जाण्यास मुभा दिली. मात्र प्रशासन आणि कामगार यांच्यात समन्वय होत नसल्याने कामगार पायी चालत घराकडे निघाले आहेत. कामगारांचे लोंढे महामार्गाने चालत आहेत. संगमनेरमधून सुमारे ६०० कामगार मध्यप्रदेश व बिहारकडे पायी निघाले होते. ही बाब राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या निदर्शनास आली. महामार्गावर थांबून कामगारांना एकत्र केले़. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. या मार्गे मोकळ्या जाणा-या ट्रक थांबून त्यांनी कामगार घेऊन जाण्याची विनंती केली. काहींना भाडे ठरवून दिले़ ट्रक चालकही कामगारांना घेऊन जाण्यास तयार झाले. संगमनेरचे तहसीलदारांनीही पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत कामगारांना एकत्र करण्याचे आवाहन केले़. आता इतर तालुक्यांतील तालुकाध्यक्षांनाही कामगारांना घरी जाण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पवार यांनी केले असून, प्रशासन आणि कामगारांमध्ये समन्वय साधून त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे पवार म्हणाले़.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरNCPराष्ट्रवादी काँग्रेसLabourकामगार