शेवगाव : तालुक्यातील खरडगाव येथे मंगळवारी रात्री उशिरा वाळूतस्करांनी तलाठ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याबाबत बुधवारी शेवगाव पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. तलाठ्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
वाळूचोरांचा तलाठ्यावर हल्ला
By | Updated: December 5, 2020 04:34 IST