शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधून आणखी १६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:08 IST

अहमदनगरमध्ये कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रूग्णाच्या संपर्कातील ८ व अन्य ८ अशा एकूण १६ जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत. 

अहमदनगर : अहमदनगरमध्ये कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रूग्णाच्या संपर्कातील ८ व अन्य ८ अशा एकूण १६ जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत. नगरमध्ये दुबईहून आलेल्या चौघांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. तर उर्वरित तिघांचे नमुने निगेटिव्ह आले. शुक्रवारी या कोरोनाबाधीत रूग्णाची माहिती प्रशासनाने जाहीर केली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. दूबईहून आलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या थेट संपर्कात चार जण, तर दूरच्या संपर्कात चार जण आले होते. याशिवाय इटलीहून आलेला एकजण व त्याच्या संपर्कातील तिघे आणि जिल्हा रूग्णालयात स्वत:हून तपासणीसाठी आलेले चौघे अशा एकूण १६ जणांचे नमुने पुण्याला एनआयव्हीकडे पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. रूग्णाला बूथ हॉस्पिटलमध्ये हलवले दरम्यान, कोरोनाबाधीत रूग्णाला जिल्हा रूग्णालयातून बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण केंद्रात हलवले आहे. १६ पैकी ४जण थेट रूग्णाच्या थेट संपर्कात होते. त्यांचे नमुने घेऊन त्यांना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. तर उर्वरित १२ जणांना त्यांच्या घरी निगरानीखाली ठेवले आहे. ..तर रूग्णाला डिस्चार्जकोरोनाबाधीत रूग्णाला सर्दी, खोकल्यासारखी कोणतीही लक्षणे नाहीत. तो ठणठणीत आहे. परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो आरोग्या विभागाच्या देखरेखीखाली आहे. आणखी सात दिवसांनी पुन्हा या रूग्णाचे थुंकीचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्यात अहवाल निगेटीव्ह आला तर रूग्णाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य