शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा संस्थान तुप खरेदीतील लाच प्रकरणी चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:16 IST

साईबाबा संस्थानातील तुप खरेदी प्रकरणातील कथीत लाच प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, अहमदनगर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व शिर्डी प्रांताधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी या तपास पथकाची नियुक्ती केली आहे.

शिर्डी : साईबाबा संस्थानातील तुप खरेदी प्रकरणातील कथीत लाच प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, अहमदनगर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व शिर्डी प्रांताधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी या तपास पथकाची नियुक्ती केली आहे.साईबाबा संस्थानात गेल्या वर्षी आठ डिसेंबर रोजीच्या बैठकीत तुप खरेदी प्रकरणी स्मृती डेअरीचे संचालक अमन गोयल यांनी साईबाबा संस्थानच्या वरिष्ट अधिकारी व विश्वस्तांनी लाच घेतल्याचा आरोप केला होता. ही चर्चा सार्वजनिक झाल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.या प्रकरणी संस्थानची बदनामी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर सामाजिक कार्यकर्ते संदिप कुलकर्णी यांनी अध्यक्ष सुरेश हावरे व मुख्यमंत्री यांचेकडे या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. याच वेळी सामाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनीही या तुप लाच प्रकरणी विधि व न्याय विभागाकडे स्वतंत्र तक्रार केली होती. तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. कुलकर्णी यांनी संस्थान अध्यक्ष हावरे यांच्याकडे केलेली तक्रारही हावरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती.या सर्व वेगवेगळ्या तक्रारीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते़ काल, १८ जुलै पासुन समितीची सुनावणी सुरू झाली.  काल केवळ संदीप कुलकर्णी या समिती समोर उपस्थीत झाले. इतर तक्रारदार बाहेरगावी असल्याने तसेच कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्याने अनुपस्थीती होते. पुढील सुनावणी एक आँगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. या दिवशी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे व स्मृती डेअरीचे संचालक अमन गोयल, रावसाहेब खेवरे यांनाही माहिती घेण्यासाठी हजर राहाण्यासाठी कळवण्यात आल्याचे प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी