शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यानी साई संस्थान बैठकीचे कामकाज बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 19:53 IST

साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले.

शिर्डी : साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले.संबंधित शेतक-याची जमीन खरेदी करण्यासंबंधी या व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय घेण्याची ग्वाही संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. न्यायालयाने यापूर्वीच अनुमती देऊन तसेच गेल्या सात महिन्यांपूर्वी संस्थाननेही या संदर्भातील उपोषणकर्त्यांना आश्वासन देऊनही अशोक गोंदकर यांची जमीन खरेदी केली नाही़ याबाबत संस्थान काहीही ठोस भूमिका घेत नसल्याने मंगळवारीच गोंदकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी अशोक गोंदकर यांनी साईनिर्माण संघटनेचे अध्यक्ष विजय कोते व माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता अनेक कार्यकर्त्यांनी संस्थानच्या सभागृहाच्या दरवाजाचा ताबा घेतला़ दरवाजालाच फलक लावून प्रवेश बंद केला़ तसेच सभागृहासमोर बसून टाळ वाजवून आंदोलन सुरू केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, सचिन चौघुले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलक हटत नसल्याचे बघून व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणेचा वापर करून अन्यत्र बैठक घेण्याचा पवित्रा घेतला. यानंतर आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता पाहून हावरे यांनी विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांना चर्चेसाठी पाठविले. आंदोलकांनी चर्चेस नकार दिल्याने अखेर हावरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आजच सभागृहात निर्णय घेऊन शासन मान्यतेसाठी पाठवू, त्या मान्यतेनंतर जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करू, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा योगिता शेळके, विश्वस्त बिपीन कोल्हे, प्रताप भोसले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा