शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पुण्यतिथीनिमित्त साईबाबांची सुवर्ण रथातून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:58 IST

साईनगरीत साजरा होत असलेल्या १०१ व्या साई पुण्यतिथीनिमित्त  मध्यान्हीला पारंपरिक पद्धतीने ‘आराधना’ विधी करण्यात आला़ पुण्यतिथीच्या दिवशी ‘आराधना’ किंवा ‘समाराधना विधी’ केला जातो़ जगभरातील करोडो भाविक  पुण्यतिथीनिमित्त साईबाबांना सुवर्ण रथातून मिरवणूक माता-पिता व गुरूस्थानी मानत असल्याने या विधीला विशेष महत्व आहे़

शिर्डी : साईनगरीत साजरा होत असलेल्या १०१ व्या साई पुण्यतिथीनिमित्त  मध्यान्हीला पारंपरिक पद्धतीने ‘आराधना’ विधी करण्यात आला़ पुण्यतिथीच्या दिवशी ‘आराधना’ किंवा ‘समाराधना विधी’ केला जातो़ जगभरातील करोडो भाविक  पुण्यतिथीनिमित्त साईबाबांना सुवर्ण रथातून मिरवणूक माता-पिता व गुरूस्थानी मानत असल्याने या विधीला विशेष महत्व आहे़मंगळवारी सकाळी गावातून भिक्षा झोळी, सायंकाळी खंडोबा मंदिरात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम तर रात्री शहरातून साई प्रतिमेची सुवर्ण रथातून मिरवणूक काढण्यात आली. द्वारकामाईत सुरू असलेल्या अखंड साईसचरित्राच्या पारायणाची मंगळवारी पहाटे सांगता झाली़ त्यानंतर साईसच्चरित्र व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली़ यात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पोथी, संस्थानचे अधिकारी पंढरीनाथ शेकडे यांनी विणा, विठ्ठल बर्गे व राजेंद्र जगताप यांनी प्रतिमा घेऊन सहभाग नोंदवला. संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, अ‍ॅड. मोहन जयकर, स्मिता जयकर, नगराध्यक्षा अर्चना कोते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.आपल्या हयातीत बाबा रोज पाच घरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत. त्याप्रमाणे प्रतीकात्मक स्वरूपात सकाळी  शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी संस्थानचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता ह.भ.प. गंगाधरबुवा व्यास (डोंबिवली) यांचे कीर्तन झाले. बाबांच्या आगमनाची ओळख असलेल्या खंडोबा मंदिरात सायंकाळी दसºयाचे सीमोल्लंघन झाले. रात्री पंडीत सुगाटो भादुरी, कोलकत्ता यांच्या क्लासिकल मंडोलिन आणि भजन कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रात्री ९.१५ वाजता श्रींच्या रथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या रथ मिरवणुकीत स्थानिक भजनी मंडळ, झांज पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथक, तसेच ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले़

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर