कोपरगाव : शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात रविवारी ( दि.६ ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य संदीप अजमेरे, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी. व्ही. तुपसैंदर, आर. आर. लकारे, एस. एन. शिरसाळे, ए. जे. कोताडे, व्ही. एम. आव्हाड, के. एस. गोसावी, के. एच. महानुभाव, आर. आर. बोरावके, ए. जी. गायकवाड, यू. एस. रायते, एस. एस. वाडीले, आर. एस. तुपकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डिस्टसिंग पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अनिल काले यांनी केले तर अनिल अमृतकर यांनी आभार मानले.