शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

डोळ्यांवर पट्टी बांधून रूद्र करतो पुस्तकवाचन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:45 IST

अहमदनगर : डोळ्यावर चक्क पट्टी बांधून कोणतेही पुस्तक वाचन, डोळे बंद करून लीलया इकडून तिकडे विहार, एवढेच नव्हे तर लपलेली व्यक्तीसुद्धा वासाने शोधून काढणे... ही कुठली जादू किंवा चमत्कार नाही तर मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनची किमया असून लोणी बुद्रूक येथील रुद्र आसावा याने ती साध्य केली आहे.

रुद्र रामकिसन आसावा हा लोणी बुद्रूक (ता. राहाता)  येथील विद्यार्थी असून तो पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत आहे. या चिमुरड्याने लॉकडाऊनच्या काळात अवघ्या दीड महिन्यात एक आगळी-वेगळी कला साध्य केली आहे. प्रथम पाहणा-याला ती एखादी जादू किंवा चमत्कार असल्यागत भासते. परंतु त्यामागील वास्तविकता समजल्यानंतर समोरील व्यक्ती आश्चर्याने तोंडात बोट घालते.

मिडब्रेशन अ‍ॅक्टिव्हेशनह्ण (प्रज्ञा जागृती) असे या कलेचे नाव आहे. यात कपाळाच्या मध्यभागी असलेल्या ज्ञानाचा तिसरा डोळा उघडला जातो. त्यामुळे शरीरातील बलस्थाने व कल्पनाशक्तीचा जास्तीत जास्त वापर होऊन डोळे बंद असतानाही दिसायला लागते. प्रज्ञाजागृती केल्याने बंद डोळ्यांनी वाचणे, वासावरून वस्तू ओळखने, गाडी चालवणे शक्य होते. रुद्रला मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनसाठी वडील रामकिसन आसावा यांनी मार्गदर्शन केले. वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्मळवाडी (निर्मळपिंप्री, ता.राहाता) येथे प्राथमिक शिक्षक आहेत. या कलेच्या मदतीने रुद्र हा डोळ्यावर पट्टी बांधून विविध चलनी नोटा ओळखणे, चित्र रंगवने, बौद्धिक क्यूब सोडवणे, तसेच लपलेल्या व्यक्तीला वासाने शोधून काढतो. रुद्रचा सोशल मीडियावरील व्हिडिओ सध्या अनेकांना अचंबित करत आहे.

सध्या नवीन शैक्षणिक धोरणात आर्टिफिशयल इंटेलिजन्स या नवीन संकल्पनेचा समावेश केला आहे. मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनमुळे विद्यार्थ्यांमधील स्मरणशक्तीचा विकास होतो. अवघड घटकाचे लवकर आकलन होते. त्यामुळे ही कला दैनंदिन अभ्यासक्रमासह स्मरणशक्ती विकसित करण्यासही उपयोगी ठरत आहे.

मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन एक बौद्धिक विकासाची कला आहे. योग, प्राणायाम, तसेच ध्यानधारणेतून आणि दैनंदिन सरावातून ही कला साध्य होते. कपाळाच्या मध्यभागी असलेल्या ज्ञानाचा तिसरा डोळा यात उघडला जाऊन शरीरातील बलस्थाने व कल्पनाशक्तीचा वापर  होत कला विकसित केली जाते.    - रामकिसन आसावा, रुद्रचे मार्गदर्शक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र