शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुळा उजव्या कालव्यातून २० मार्चला आवर्तन सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:08 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. पाणी वापर संस्थांनी लेखी मागणी केली नसतांनाही शेतक-यांच्या दबाव तंत्रामुळे पाटबंधारे खात्याला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी झुकावे लागले आहे. मुळा पाटबंधारे खात्याकडे केवळ चारच संस्थांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाटबंधारे खाते कालव्यातून पाणी सोडण्यास राजी नव्हते.  लेखी मागणी असल्याशिवाय पाणी सोडता येत नाही असा पाटबंधारे खात्याचा नियम आहे. मात्र नियम डावलून पाटबंधारे खात्याला मंत्र्यांच्या दबावापुढे झुकावे लागले आहे. डाव्या कालव्यातून ब्रिटीशकालीन पध्दतीचा अवलंब करून लेख मागणीनंतर पाणी सोडण्यात आले होते.  मात्र उजव्या कालव्याकडे लेखी मागणी नसल्याने पाटबंधारे खाते काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.पाटबंधारे खात्याने पाणी सुटण्याचे प्रगटन मुदत १६ मार्च दिली होती. मात्र १६ मार्चपर्यंत केवळ १०० हेक्टरची मागणी नोंदविण्यात आली होती. पाणी वापर संस्थांनी ताठर भूमिका घेत लेखी मागणीकडे पाठ फिरविली. पाटबंधारे खाते व पाणी वापर संस्था यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. १९ मार्चपर्यंत कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण होणार आहे. रब्बी आवर्तन सोडण्यापूर्वीही दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र रेतीमुळे पुन्हा दुरूस्तीची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी हिरवा कंदील दाखविला होता. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय मंत्री शंकरराव गडाख व लोकप्रतिनिधी यांनीही शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणDamधरणWaterपाणी