शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: March 18, 2024 16:07 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडी होणार आहेत

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडी होणार आहेत. यामुळे विधानसभा निवडणूक कोणाच्या पथ्यावर पडते, हे निवडीनंतरच कळणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडे पाच ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला उमेदवार आहेत. यासह विद्यमान उपाध्यक्षा मोनिका राजळे आणि कर्जत तालुक्यातील मंजुषा गुंड यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमध्ये चांगलीच रस्सीखेच निर्माण झालेली आहे. पक्षीय पातळीवर अद्याप कोणतीच चर्चा झाली नसल्याचे नेते आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरच जिल्ह्यातील बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत. कोपरगाव तालुक्यातून नंदा भुसे, श्रीरामपूर तालुक्यातून अश्विनी भालदंड आणि अनिता पवार, पाथर्डी तालुक्यातून योगीता राजळे आणि नगर तालुक्यातून कालिंदी लामखडे या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला उमेदवार आहेत. तसेच अन्य दोन सदस्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्यांची वर्णी देखील अध्यक्षपदी लागू शकते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. यात कर्जत, पारनेर तालुक्यातून कोणाला उमेदवारी मिळते. माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजीव राजळे हे भाजपाच्या वाटेवर असून त्यांच्या प्रवेश होतो की नाही. यावर राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष ठरणार आहे. अशीच अवस्था काँग्रेसमध्ये आहे. राहुरी तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा कब्जा आहे. त्या तालुक्याला उपाध्यक्षपद मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो. अशीच परिस्थिीती कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असल्याने विधानसभा निवडणुकीला आणि उमेदवारीला जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीची झालर आहे. या निवडीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार असून कोणाचे समाधान कसे करावे, यासाठी श्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे उमेदवार २० तारखेला अंतिम करण्यात येणार आहे. अद्याप कोणतीच चर्चा नाही. मात्र, पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. राष्ट्रवादीकडे पाच महिला सदस्य आणि दोन सदस्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. यामुळे यापैकी एकला अध्यक्षपदाची संधी मिळेल. - पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी. अध्यक्षपदासाठी नगर तालुका आणि कर्जतमध्ये स्पर्धा आहे. कर्जतकर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. कर्जत- जामखेड मतदारसंघ दुर्लक्षित मतदारसंघ असल्याचे तेथील इच्छुकांचे म्हणणे आहे. तर पारनेर मतदारसंघात नगर तालुक्यातील निर्णायक पट्ट्याचा समावेश आहे. यात अध्यक्षपद आल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होईल, असे पारनेरकरांचे म्हणणे आहे.