शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या छताला पहिल्याच पावसात गळती; वीस लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 14:30 IST

कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे.

रोहित टेके  । कोपरगाव : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे शासनाने दुरुस्तीसाठी केलेला २० लाखांचा खर्च पाण्यात गेला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव कार्यालयाच्यामार्फत या इमारतीचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पाच महिन्यापूर्वी २० लाख खर्च करून कार्यालयासाठी कूपनलिका, फरशीचे पूर्ण काम, भिंतींची दुरुस्ती करून रंगकाम, छतावरील वॉटर प्रूफिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासह इतरही कामे करण्यात आली होती. मात्र शासनाने एवढा खर्च करूनही पाचच महिन्यात भिंतींना तडे गेले.

     यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात २१ मे रोजीच्या अंकात वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळी कोपरगाव येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्वक केले असून या इमारतीच्या मूळ पायातच दोष असल्याने इमारतीच्या भिंतींना तडे गेले असल्याचे सांगितले होते. मात्र गुणवत्तापूर्वक केलेल्या कामातून पहिल्याच पावसात छतातून पाण्याची गळती होत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तडे गेलेल्या भिंतींची तत्काळ दुरुस्ती करू असे सांगितले होते. तीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालय परिसरातील कूपनलिकेत विद्युत मोटरही बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचाही विसर संबंधित विभागाला पडला आहे.  

 कार्यालय परिसरात  साचले पावसाचे पाणीविशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेरील परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहे. परंतु त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या गटारीचे ढापे खूप उंचीवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात साचलेले पावसाचे पाणीही त्या गटारीतून वाहत नसल्याने या परिसरातच पाण्याचे मोठे तळे साचले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊसGovernmentसरकार