अहमदनगर : नगर तालुक्यातील सांडवा गावातील खांदवे वस्तीवर पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली. घरातील सर्वांना बांधून टाकत मारहाण करत चोरट्यांनी घरातील ४५ हजार रुपये व २ तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला.बापू नामदेव खांदवे, त्यांच्या मीना बापू खांदवे व त्यांची दोन मुले घरात झोपलेली होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चौघांनाही मारहाण करत मुलाच्या आॅपरेशनसाठी ठेवलेले ३५ हजार रुपये, २ तोळे लंपास केले. बाहेरून दरवाजाची कडी लावून चोरट्यांनी शेजारील अनुसया खांदवे यांच्या बंद घरातील १५ हजार रुपयांचा ऐवजही लांबविला. जाताना मोबाईलच्या बॅटरी तसेच मोटारसायकल बॅटरी काढून नेल्या. त्यानंतर बापू खांदवे यांनी पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:ची सुटका केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
नगर तालुक्यातील सांडव्यात जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:43 IST