शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्तालूट करणारी टोळी जेरबंद; चाकूच्या धाकाने अनेकांना  लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:38 IST

प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत चाकूचा धाक दाखवून लूटमार करणा-या चौघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नगर-पुणे रोडवर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़. 

अहमदनगर : प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत चाकूचा धाक दाखवून लूटमार करणा-या चौघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. नगर-पुणे रोडवर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़.  कय्युम काझी कुरेशी (वय २३ रा़ बाबा बंगाली, अहमदनगर), सद्दाम मोहम्मद अली (वय २३रा़ झेंडीगेट), मोईन बादशाह शेख (वय २० रा़ बुरुडगाव) व मुसेफ नासीर शेख (वय २० रा़ मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी शुक्रवारी (दि़२१) माळीवाडा बसस्थानक येथून विशाल विजय कोबरणे (गणेगाव ता़ राहुरी) याला राहुरी फॅक्टरी येथे सोडतो असे सांगून त्याला जबरदस्तीने मिरावली पहाड परिसरात घेऊन गेले़. तेथे चाकूचा धाक दाखवून आरोपींनी विशाल याचा मोबाईल व कागदपत्र हिसकावून घेत त्याला सोडून दिले़. याबाबत विशाल कोबरणे याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ही लूटमार करणारे आरोपी नगर-पुणे रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना कारसह ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या चौघांनी विविध ठिकाणी लूटमार केल्याचे समोर आले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.  दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन कार, मोबाईल असा ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक शिरसाठ हे करत आहेत. वीस दिवसांत १० जणांची लूटमार नगर शहर व परिसरात महिलांचे दागिने ओरबाडणे आणि शस्त्रांचा धाक दाखवून प्रवशांची लूटमार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या २० दिवसांत नगर शहरात धूमस्टाईलने तीन महिलांचे दागिने ओरबाडले तर एका महिलेचे दोन लाख हिसकावून नेले आहेत. नगर तालुका, एमआयडीसी आणि शहर पोलीस ठाणे हद्दीत सहा जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले आहे. यात चार जण वाहनचालक आहेत. लूटमार करणा-या टोळ्या नगरच्याच नगर शहरात प्रवाशांची लूटमार करणा-या टोळ्या या नगर व परिसरातीलच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे लुटारु पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होऊ शकतात.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस