शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवारांचा उदय; भाजपचा गड ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:04 IST

शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात  ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़. 

कर्जत-जामखेड मतदारसंघ/ अशोक निमोणकर /मच्छिंद्र अनारसे ।  शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात  ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़. राम शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मतदारसंघात मोठा निधी आणला़. प्रत्यक्षात मात्र अपेक्षित कामे जनतेला दिसली नाहीत़. शिंदेंभोवती ठराविक कार्यकर्त्यांचा वाढलेला गोतावळा आणि त्यांचाच झालेला विकास यामुळे मतदारांमध्ये नाराजी वाढलेली होती़. दुसरीकडे रोहित पवार यांनी दीड ते दोन वर्षांपासून मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणीला प्रारंभ केला होता़. दुष्काळात पवार यांनी स्वखर्चाने मतदारसंघातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आणि तेव्हापासून रोहित पवार यांना जनतेची सहानुभूती मिळू लागली़. तसेच मतदारसंघात विविध आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, युवा मतदारांच्या थेट संपर्कात राहणे आदी उपक्रम त्यांनी राबविले़. निवडणूकाळात बारामती मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाचे चित्र जनतेला दाखविण्यात आले़. असाच विकास कर्जत जामखेडचा करायचा आहे हे पवारांचे आश्वासन येथील जनतेला चांगलेच भावले़.रोहित यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही मतदारसंघातील महिला, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून जनसंपर्क वाढविला़. या सर्व बाबींकडे सुरुवातीला राम शिंदे यांनी दुर्लक्ष केले. निवडणूक काळात मतदारसंघात शरद पवार यांच्या दोन सभा, अजित पवार यांच्या तीन सभा तसेच छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभांनी रोहित पवारांसाठी चांगले वातावरण तयार केले़. कर्जत येथील सांगता सभेत शरद पवार यांनी मी पंतप्रधान झालो नाही असे शल्य व्यक्त करत आता रोहित पवार यांच्या रुपाने जनतेला वारसा दिला. असे भावनिक आवाहन जनतेला केले होते़. राम शिंदे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा सर्वसामान्य जनतेशी दुरावा वाढला़. मतदारसंघाचा ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न शिंदे यांना पूर्णत: मार्गी लावता आला नाही़.  निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सूत गिरणी व साखर कारखान्याचे उपस्थित केलेले मुद्दे जनतेला भावले नाहीत़. केलेली विकासकामेही जनतेपर्यंत पोहोचविता आली नाहीत़. तसेच भाजपा सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी आदी कारणे राम शिंदेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले़. प्रस्थापितांच्या धाटणीचे राजकारण शिंदे यांच्यासाठी अडचणीचे ठरले. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारJamkhedजामखेड