शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरण्यावरून दंगल : तीन जखमी, ४१ जणांवर गुुन्हा दाखल, १४ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 13:56 IST

येथील तपनेश्वर गल्लीतील कुंभारतळ येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नळावर पाणी भरण्यावरून दोन गटात काठी, दगड व कोयत्याचा वापर होऊन दंगल झाली़

जामखेड : येथील तपनेश्वर गल्लीतील कुंभारतळ येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नळावर पाणी भरण्यावरून दोन गटात काठी, दगड व कोयत्याचा वापर होऊन दंगल झाली़ या दंगलीत तीन जखमी झाले आहेत. दोन गटात झालेल्या दंगलीवरून परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार एकूण ४१ जणांवर गुुन्हा दाखल झाला आहे. तर १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत जामखेड पोलिसांत पुष्पा रोहिदास डोकडे (वय ३५, रा. कुंभारतळ, जामखेड) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी नळाचे पाणी भरत असताना आरोपी बंड्या उर्फ अबुजर अजीज बागवान फिर्यादी पुष्पा डोकडे यांच्यामध्ये कोण अगोदर पाणी भरणार यावरुन वाद झाले़यावेळी बागवान यास राग आल्याने त्याने डोकडे यांना शिवीगाळ, दमदाटी केली़ तसेच शाहीन बागवान, रेश्मा बागवान, अस्लम बागवान, पप्पू शेख, तरबेज बागवान, रईस बागवान, फिरोज सय्यद, अय्युब बागवान, साहील बागवान, फारूख बागवान, अय्यास बागवान, अजिज बागवान, फिरोज बागवान, आयशा बागवान, (रा. बाजारतळ, जामखेड) व इतर ३ ते ४ अनोळखी इसम यांनी पुष्पा डोकडे हिची नणंद अंजना पवार व त्यांचा मुलगा आकाश पवार यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.दुसरी फिर्याद शाहीन अजिज बागवान (वय ३५, रा. कुंभारतळ) या महिलेने दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी सहा वाजता तपनेश्वर गल्लीतील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना आरोपी बाळू डोकडे याची पत्नी व मुलगी (नाव माहीत नाही), राजू डोकडे, नितीन डोकडे, रोहित पवार, आकाश डोकडे, योगेश डोकडे, सागर मोहळकर, राजू फुलमाळी, सुरेश फुलमाळी, सुभाष फुलमाळी, सुरज पवार, सचिन डोकडे (रा. जामखेड), सुदाम भिसे (बटेवाडी), अंकुश काळे (आळजापूर, ता. करमाळा, जि. सोलापूर) व इतर ५ जणांनी अगोदर पाणी भरुन द्यावे, यासाठी वाद घातला़ तसेच फिर्यादी शाहीन बागवान हिचा दिर याकूब अकबर बागवान यास संदीप डोकडे या आरोपीने त्याच्या हातातील दगड मारून जखमी केले़ यावरून पोलिसांनी २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सुरज पवार, राजू डोकडे, बाळू भिसे, अंकुश काळे, काजल डोकडे, पुष्पा डोकडे, अबुजर बागवान, साहील सय्यद, फारूख सय्यद, अय्यास बागवान, शाहीन बागवान, अजिज बागवान या आरोपींना अटक केली आहे.तीन पथकांची नियुक्तीशहरातील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे दोन गटात दंगल झाली असून अनेक ठिकाणी पाण्यावरून मारामारीच्याही घटना घडल्या आहेत. गुरुवारी शहरातील तपनेश्वर भागात झालेल्या दोन गटातील दंगलींमुळे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपाधीक्षक संजय सातव हे शुक्रवारी दिवसभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे व जामखेड पोलिसांनी दंगलीतील आरोपी पकडण्यासाठी परिश्रम घेतले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस फरार आरोपींच्या शोधात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड