शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

आरटीओ भोवतीच संशयाचे वलय

By admin | Updated: September 21, 2016 00:28 IST

श्रीरामपूर : श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या स्वत:च्या नावे वाहन नोंदणीची कोणतीच माहिती अजूनपर्यंत नेवाशाच्या विकास घोरपडे यांना नाही

श्रीरामपूर : श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या स्वत:च्या नावे वाहन नोंदणीची कोणतीच माहिती अजूनपर्यंत नेवाशाच्या विकास घोरपडे यांना नाही. त्याने कधीतरी दिलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर टिपर नोंदणी करून तो औरंगाबादला विकण्यात आला. हा टिपर श्रीरामपूर शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. घोरपडे याच्या नावाचा गैरवापर करण्यामध्ये आरटीओचा एजंट शहाबाज शेख याचा हात असावा असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान घोरपडे यांचे कागदपत्रं शेख याला मिळालीच कशी? या प्रश्नामुळे श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाभोवतीच आता संशयाचे वलय निर्माण होऊ पाहत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ मालमोटारीची नोंदणी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस येताच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये आरटीओ कार्यालयातील शहाबाज शेख या एजंटाचाही समावेश आहे. नेवासा तालुक्यातील खलाल प्रिपींच्या विकास घोरपडे यांनी कधीतरी आरटीओ कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर एक टिपर नोंदविण्यात आला. तो टिपर नंतर औरंगाबाद कार्यालयांतर्गत नोंदणी करून तिकडे विक्री करण्यात आला. घोरपडे यांच्या नावाची कागदपत्रे आरटीओ कार्यालयात असताना ती एजंट शेख याला मिळालीच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या बनावट नोंदणी प्रकरणात आरटीओ कार्यालयाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी औरंगाबाद येथे विक्री झालेला टिपर हस्तगत केला आहे. दरम्यान पवार यांनी नेवाशाच्या घोरपडे यांच्यासंदर्भात माहिती घेतली असता स्वत:च्या नावे वाहन नोंदणी झाल्याबद्दल ते स्वत:च अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यातील मुख्य आरोपी गुरूमुखसिंग संधू व एजंट शहाबाज शेख हे दोघेही फरार आहेत. त्यामुळे पोलिसांना या गुह्याचे धागेदोरे जुळविण्यात विलंब होत आहे. (प्रतिनिधी)