एन. जे. पवार : ‘राजाराम महाविद्यालय - काल, आज आणि उद्या’ परिसंवादातील सूरकोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीच्या काळात गुणवान व होतकरू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी मिळण्यासाठी राजाराम कॉलेज सुरू झाले. ज्या उद्देशाने या महाविद्यालयाची सुरुवात झाली, तो उद्देश आजही कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही या महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. राजाराम महाविद्यालयातर्फे आज, बुधवारी ‘राजाराम महाविद्यालय - काल, आज आणि उद्या : एक दृष्टिक्षेप’ या परिसंवादामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य (मंत्रालय)चे डी. जे. रसाळ होते. पवार म्हणाले, महाविद्यालयाने काळाची गरज ओळखून आपल्यामध्ये नवनवीन बदल केला आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. सहसचिव, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य (मंत्रालय)चे डी. जी. रसाळ म्हणाले, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणाला चालना देऊन त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. काळाच्या ओघातही या महाविद्यालयाने आपल्यामध्ये बदल करून स्पर्धेच्या युगात ते सक्षम बनले आहे. हा महाविद्यालयास मोठा इतिहास असल्याने येथील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी यांचा अभिमान बाळगला पाहिजे. पुणे येथील उच्च शिक्षण संचालक प्रा. डॉ. पी. आर. गायकवाड म्हणाले, महाविद्यालयातून विकसित झालेले मनुष्यबळ व विकसित होणारे मनुष्यबळ हे कोणत्याही महाविद्यालयाचा कणा असते. त्यामुळे या आजी-माजी विद्यार्थ्यांच्यामध्ये महाविद्यालयाने समन्वय राखून आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला पाहिजे. जेणेकरून या दोघांना आपल्या विचारांचे आदानप्रदान करता येणार आहे. याप्रसंगी कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, विभागीय शिक्षण सहसंचालक आर. एन. कांबळे, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, प्री-आय. ए. एस. सेंटरचे संचालक एस. बी. महाराज-पाटील, माजी आजी-माजी विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. (प्रतिनिधी) अॅस्ट्रो-फिजिक्स अभ्यासक्रमाचा प्रस्ताव द्याराजाराम महाविद्यालयाने अॅस्ट्रो-फिजिक्स या अभ्यासक्रमाची शाखा सुरू करावी. याबाबत महाविद्यालयाने उच्च शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीन, अशी ग्वाही पुणे येथील शिक्षण संचालक प्रा. डॉ. पी. आर. गायकवाड यांनी दिली.
मागितले रिक्षा भाडे, दिले बस पासचे शुल्क
By admin | Updated: September 25, 2014 00:31 IST