शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

बोधेगावजवळील सोनदरी डोंगरातील ‘समृद्ध निसर्ग’ फुलला; धबधब्याकडे पर्यटकांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:08 IST

शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून अगदी जवळच असलेल्या श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान व सोनदरी डोंगर परिसर फुलला आहे. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत.

संजय सुपेकर ।  बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून अगदी जवळच असलेल्या श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान व सोनदरी डोंगर परिसर फुलला आहे. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत. पशुपक्ष्यांची किलबिल व खळखळून वाहणारे झरे मन मोहून टाकतात. बोधेगाव (ता. शेवगाव) येथून पंधरा किलोमीटर अंतरावर नागलवाडी, गोळेगाव परिसरात वाल्मिकी ऋषी व राम-सीतेचा अधिवास लाभलेले श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान आहे. या परिसराला पौराणिक, ऐतिहासिकही महत्त्व आहे. रामायणात या ठिकाणचा ‘दंडकारण्य’ म्हणून उल्लेख आढळून येतो. हिरवाईने नटलेला सोनदरी डोंगर पर्यटकांच्या स्वागतासाठी आसुसलेला दिसून येतो. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत. पशुपक्ष्यांची किलबिल व खळखळून वाहणारे झरे मन मोहून टाकतात.  डोंगराच्या मधोमध असणारा पाण्याने तुडुंब भरलेला गोळेगावचा तलावही पर्यटकांना आकर्षित करतो. डोंगरावरून धबधब्याकडे खाली उतरण्यासाठी फार वर्षांपूर्वी पायºया असणारा पूल बांधलेला आहे. येथील डोंगर रांगेत हिरडा, बेहडा, अर्जुन सौताडा, गुळवेल, गुंज, चंदन सौताडा आदी गुणकारी वनऔषधी आढळतात. मोर, ससा, हरिण, काळवीट असे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नजरेस पडतात. येथील सोनदरी डोंगरात महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक चक्रधर स्वामींचे वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणी महानुभाव पंथाचे प्रार्थनास्थळ आहे. पंथाचे अनुयायी येथे विविध सणानिमित्त दीपोत्सव करतात. सध्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यटक येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. असा पर्यटकांना आकर्षित करणारा समृद्ध निसर्ग केवळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित न झाल्याने दुर्लक्षित आहे. यामुळे येथील पर्यटनस्थळ विकासाला चालना देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा निर्सगप्रेमी डॉ. सतीश चव्हाण, प्रवीण भराट, प्रा. राहुल भोंगळे, अमोल कमाने, संजय वारकड, खंडू शिंदे, मयूर हुंडेकरी, राज शेख आदींनी व्यक्त केली आहे.येथील परिसर नयनरम्य निसर्ग, पाण्याचे झरे, धबधबे, वनौषधी, विविध वन्यजीव आदी नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ न शकल्याने अद्यापपर्यंत दुर्लक्षित आहे. सध्या सुरू असलेल्या भगवानगड ते बोधेगाव या देवभूमीच्या रस्त्यामुळे हा परिसर नावारूपाला येईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे निसर्गप्रेमी डॉ. सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Shevgaonशेवगावtourismपर्यटन