शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सगुणा पध्दतीने भाताचे उत्पादन वाढणार तिपटीने; २०० शेतक-यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 15:30 IST

भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे  उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

हेमंत आवारी। 

अकोले : भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे  उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतक-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

बायफ संस्थेच्या पुढाकाराने तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील मान्हेरे, आंबेवंगण, टिटवी, कोदणी, खिरविरे, पेढेवाडी, तिरडे, पाचपट्टा या भागात सगुणा तंत्रज्ञानाने भाताची लागवड केली आहे. आदिवासी भागात भात हे मुख्य पीक असून यावरच अर्थकारण अवलंबून असते. पारंपरिक पध्दतीने भात लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी ‘राप’ पध्दत वापरली जाते. यामुळे पालापाचोळा व शेणखत बायोमास जाळला जातो. धुरामुळे प्रदूषण होते. अनेक जीवजंतू व उपयुक्त असे जीवाणू नष्ट होतात. रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड म्हणजेच आवणी केली जाते. चिखलनी आवणी कामासाठी कष्ट जास्त पडतात.

सगुणा भात लागवड तंत्रज्ञान वापरून लागवड करताना १४० सेंटीमीटर रुंदीचे व २० सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून त्यावर बियाणे पेरतात. त्यामुळे लागवडीचा परत खर्च येत नाही.  बियानेही कमी लागते. लागवड करताना दोन बिया व दोन ओळीतील अंतर २५ बाय २५ सेंटीमीटर ठेवतात. रासायनिक खतांचे व्यवस्थापन तण नियंत्रण ही कामेही सोपी होतात. भात कापणीनंतर याच वाफ्यांवर हरभरा, कडूवाल यासारखी पिके घेता येतात.

 आदिवासी भागातील लोक आजही  इर्जुकीने भात आवणी करतात. आता नव्या तंत्रज्ञानाचे महत्व पटत चालले असून काही शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे.

गतवर्षी ९५ शेतक-यांचा होता सहभागगतवर्षी ९५ शेतकरी या सगुणा प्रयोगात सहभागी झाले होते. पीक उत्पादनात चांगला फरक जाणवल्याने यावर्षी काळू करवंदे, किसन बांबेरे (कोदणी), देवराम भांगरे (देवगाव), बाळू गोडे(शेणीत) अशा दोनशे पेक्षा अधिक शेतक-यांनी सगुण पध्दतीने भात लागवड केली आहे.  शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. बायफचे जतीन साठे, राम कोतवाल, लीला कुर्हे यांनी हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेAgriculture Sectorशेती क्षेत्र