शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने आमच्या लक्ष्मीची शेतातच झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:09 IST

राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

गणेश आहेर । लोणी : हातातोंडाशी आलेल्या शेतक-यांच्या पिकलेल्या मालावर सतत बारा दिवसांपासून परतीचा पाऊस घाला घालत आहे. त्यामुळे खरिपांची पिके नेस्तनाबूत झाले. राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.  गेल्या दहा-बारा दिवसांपासून राहाता  तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.  खरीप हंगामात सुरूवातीला पिकांसाठी हवाहवासा वाटणारा पाऊस मागील चार-पाच वर्षाच्या दुष्काळाची झीज नक्कीच भरून काढणार या आशेने शेतकºयांनी यंदा कोणतीही कसर न ठेवता उत्पादन खर्चाला मोकळी वाट करून दिली होती. परंतु पिके काढणीच्या वेळी हाच जास्तीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला. बाजरी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस थांबलाच नाही. हाताशी आलेले पीक भिजल्याने  मातीमोल झाले. १८ आॅक्टोबरपासून आजतागायत राहाता तालुक्यातील शेतकरी संध्याकाळी तालुक्यात कुठे न कुठे  धो-धो पाऊस अनुभवत आहेत.आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला असला तरी तो ठराविक अंतराने उघडिप देत राहिल्याने पिकांना नुकसानकारक ठरत नव्हता. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असे. पण यावर्षी  परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला, असे गोगलगाव येथील आप्पा चौधरी यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीला गेलेले कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल आहेत. रिचेबल झाले तर फोन उचलायला तयार नाही. मंडल कृषी कार्यालयातील अधिकारी पंचनामे करण्याच्या नावाखाली कार्यालये दिवसभर बंद ठेवत आहेत. हा लोणीच्या मंडल कृषी कार्यालयातील माझा अनुभव आहे, असे गोगलगाव येथील शेतकरी काशिनाथ उगले यांनी सांगितले. सुरूवातीला झालेल्या पावसावर सोयाबीन, बाजरी पिके पेरली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला अन सोयाबीन, बाजरीची पिके वाळली. सुकून गेल्याने त्यावरून नांगर फिरवला. चा-यासाठी मका पेरली गेली. शेंडा खाणाºया अळीपासून ती कशीबशी वाचविली पण आता परतीच्या पावसाने हातची गेली, असे शेतकरी पुंजा हरी मगर यांनी सांगितले.     

टॅग्स :rahaataराहाताRainपाऊस