शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीतील ‘जम्बो’ श्वानाचा सेवानिवृत्ती सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 07:07 IST

अधिकारी, कर्मचारी भावुक; बॉम्ब शोध पथकात दहा वर्षे सेवा

- प्रमोद आहेर शिर्डी : तब्बल दहा वर्षे साई मंदिर व भाविकांची सुरक्षा करणारा तसेच न चुकता दिवसातील तीन वेळा साई दर्शन घेणारा ‘जम्बो’ श्वान पोलीस दलातून शनिवारी सेवानिवृत्त झाला़ ‘जम्बो’च्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शानदार कार्यक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारीही भावुक झाले होते.निरोप समारंभाच्या वेळी ‘जम्बो’चे औक्षण करण्यात आले. हार व शाल घालून सत्कार करण्यात आला़ ‘जम्बो’ हा लॅब्रोडर जातीचा श्वान आहे़ जिल्ह्यातील बॉम्ब शोध पथकाच्या निर्मितीतील पहिला श्वान अशी ओळख असलेल्या ‘जम्बो’ला मेडलही मिळालेले होते़ ‘जम्बो’ दोन महिन्याचा असतानाच पोलीस दलात दाखल झाला होता. सहा महिने नगरला प्राथमिक व त्यानंतर पुणे येथे स्फोटके शोधण्याचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन तो नव्यानेच सुरू झालेल्या बॉम्ब शोध पथकात सहभागी झाला होता़ वयाची दहा वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी तो नियमानुसार सेवानिवृत्त झाला. फुग्यांनी सजविलेल्या नवीन भक्तनिवासाच्या हॉलमध्ये पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ‘जम्बो’ला सेवानिवृत्तीनिमित्ताने निरोप देण्यात आला.‘जम्बो’चे दररोज साईदर्शनआंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या व सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या साईमंदिर व परिसराची रोज दुपारी व सायंकाळी आरतीपूर्वी तर रात्री मंदिर बंद होण्यापूर्वी ‘जम्बो’ तपासणी करीत असे़ समाधी मंदिरात तपासणीसाठी आल्यावर तो सर्व प्रथम साईसमाधीला प्रणाम करीत असे.

विमानतळाचीही तपासणीदर दोन दिवसांनी तो शिर्डी विमानतळाचीही ‘जम्बो’ तपासणी करीत असे़ दहा वर्षांतील सर्व व्हीआयपी दौऱ्यात व अन्य घटनातही त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे़ पूर्वी त्याच्यावर जिल्ह्याची जबाबदारी होती. नंतर त्याच्यावर उत्तरेचा कार्यभार होता़

टॅग्स :shirdiशिर्डी